मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ageing Sign: चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्याआधीच सुरू करा हे काम

Ageing Sign: चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्याआधीच सुरू करा हे काम

Jan 22, 2023, 05:03 PM IST

    • Skin Care Tips: वयाची चाळीशी पूर्ण करण्यापूर्वीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर याचा अर्थ स्किन केअर रुटीनमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन दिसू नये यासाठी या गोष्टी फॉलो करा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी टिप्स

Skin Care Tips: वयाची चाळीशी पूर्ण करण्यापूर्वीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर याचा अर्थ स्किन केअर रुटीनमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन दिसू नये यासाठी या गोष्टी फॉलो करा.

    • Skin Care Tips: वयाची चाळीशी पूर्ण करण्यापूर्वीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर याचा अर्थ स्किन केअर रुटीनमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन दिसू नये यासाठी या गोष्टी फॉलो करा.

Tips to Prevent Wrinkles in Early Age: वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणं सामान्य गोष्ट आहे. काही वेळा वेळेपूर्वी या सुरकुत्या येऊ लागतात. याचे कारण कामाचा ताण, हार्मोन्सची कमतरता, चुकीची जीवनशैली असू शकते. त्वचेचा ताण आणि लवचिकता संपत असेल, तर वेळीच काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. सुरकुत्यां सोबतच डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि डलनेस दिसू लागतो. चला तर मग जाणून घेऊया स्किन केअर रुटीनमध्ये कोणते बदल करून अकाली सुरकुत्यांपासून सुटका मिळवता येते.

ट्रेंडिंग न्यूज

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

World Asthma Day 2024: दम्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Aam Pora Recipe: चवीला अप्रतिम लागते बंगाल स्टाईल आम पोरा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

How To Identify Real Kesar: बाजारात विकलं जाणारं केशर असली की नकली? कसं ओळखाल? ‘या’ गोष्टी नक्की तपासा

सुरकुत्या घालवण्यासाठी काय आवश्यक आहे

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर त्वचेची काळजी घेण्यासाठी अंड्यांचा वापर करा. अंडी हा प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट त्वचा निरोगी बनवतात.

कशी वापरावी अंडी

अंडी वापरण्यासाठी कच्चे अंडे फोडून त्याचा पांढरा भाग काढून एका भांड्यात फेटून घ्या. चमच्याने किंवा ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर सोडा. साधारण १५-२० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून एक किंवा दोनदा अंडी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा घट्ट होईल आणि सुरकुत्या सहज पडणार नाहीत.

निरोगी आहार आवश्यक आहे

जर तुम्हाला धूम्रपान, मद्यपान किंवा जंक फूड खाण्याची सवय असेल तर त्यापासून दूर राहा. शरीराला पोषण न मिळाल्याने त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो आणि त्वचा सैल होऊ लागते. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. पुदिना, धणे, हिरवी मिरची हंगामी भाज्यांसोबत खा. यासोबतच ताजी हंगामी फळे खा. सकाळी सुका मेवा आणि नट्स खा. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. किमान ८-१० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर

जर तुम्हाला चेहऱ्यावर अंडी लावायची नसेल तर हळद हा देखील एक पर्याय आहे. गुलाब पाण्यात हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

फेशियल योगा करा

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी फेशियल योगा करा. या प्रकारचा योग तुम्ही कधीही करू शकता. तोंडावर हात ठेवून बसू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग