मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Glowing Skin: हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा या सवयी, ३ स्टेपमध्ये मिळेल चमकदार त्वचा

Glowing Skin: हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा या सवयी, ३ स्टेपमध्ये मिळेल चमकदार त्वचा

Jan 04, 2023, 01:43 PM IST

    • Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा खूप निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सकाळच्या काही सवयी फॉलो केल्या पाहिजे. या तुम्हाला तुमच्या स्किनचा ग्लो परत देऊ शकतात.
हिवाळ्यात ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी टिप्स

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा खूप निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सकाळच्या काही सवयी फॉलो केल्या पाहिजे. या तुम्हाला तुमच्या स्किनचा ग्लो परत देऊ शकतात.

    • Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा खूप निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सकाळच्या काही सवयी फॉलो केल्या पाहिजे. या तुम्हाला तुमच्या स्किनचा ग्लो परत देऊ शकतात.

Morning Habits for Glowing Skin: हिवाळ्यात प्रत्येकालाच आपल्या त्वचेची काळजी असते. हिवाळ्यात त्वचा निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही कितीही सुंदर कपडे आणि चांगला मेकअप केला तरी त्वचा निस्तेज दिसते. पण काळजी करु नका, तुम्ही या प्रकारच्या त्वचेपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सवयी बदलाव्या लागतील. सकाळच्या काही सवयी तुम्हाला चमकदार त्वचा मिळविण्यात मदत करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

१. चेहरा स्वच्छ करा

सकाळी उठल्यानंतर सॉफ्ट क्लींजरने चेहरा स्वच्छ करा. सकाळी हे करणे खूप महत्वाचे आहे. कारण बरेचदा लोक रात्री नाईट क्रीम लावून झोपतात, अशा स्थितीत सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. लक्षात ठेवा चेहरा स्वच्छ करताना फक्त थंड पाण्याचा वापर करावा.

२. टोनर आणि सीरम वापरा

चेहरा स्वच्छ केल्यानंतर टोनर आणि सीरम वापरणे खूप महत्वाचे आहे. टोनर पोर्सला डीप क्लीन करतो. त्याच वेळी, सीरम त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. म्हणूनच चेहरा धुतल्यानंतर या दोन्ही गोष्टी नेहमी चेहऱ्यावर वापरा.

३. सनस्क्रीन सर्वात महत्वाचे

बरेच लोक सनस्क्रीनला एक लक्झरी प्रोडक्ट मानतात, जे एवढे आवश्यक नाही. पण हे खरे नाही. प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या सर्वप्रकारच्या त्वचेच्या नुकसानीपासून वाचवते आणि तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या