मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Brightening Tips: चेहऱ्यावरील पिंपल्सच्या डागांचे टेन्शन सोडा, या घरगुती उपायांनी मिळवा हरवलेला

Skin Brightening Tips: चेहऱ्यावरील पिंपल्सच्या डागांचे टेन्शन सोडा, या घरगुती उपायांनी मिळवा हरवलेला

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 18, 2023 10:44 AM IST

Skin Care Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स गेल्यानंतरही त्याचे हट्टी डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. ते काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. या मास्कने फक्त तुमचे डाग निघणार नाहीत तर तुमचा हरवलेला ग्लो सुद्धा परत येईल. स्किन ब्राइट होईल.

पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedies to Reduce Pimple Marks: पिंपल आल्यानंतर बहुतेक लोकांचे लक्ष तिकडे जात असते. अनेकदा लोक ते नखाने खरडून काढतात. असे केल्याने चेहऱ्यावर अशा खुणा दिसतात ज्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते. त्यांना टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पिंपल्सला बोटाने स्पर्श न करणे. आहार आणि दिनचर्या योग्य ठेवा. चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

त्वचा स्वच्छ ठेवा

पिंपल्स बहुतेक ऑइली त्वचेवर जास्त असतात. जेव्हा तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये विष, घाण किंवा ऑइल सेबम जमा होतात तेव्हा पोर्स बंद होतात. या बंद पोर्सपासून पिंपल्स येतात. जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्स दिसू नयेत असे वाटत असेल तर चेहरा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे.

हे आहेत नैसर्गिक उपाय जे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी लावू शकता.

बेसनाचा पॅक

ही अशीच एक देसी रेमेडी आहे जी त्वचेसाठी उत्तम आहे. कितीतरी सेलिब्रिटींनी हे सांगितले आहे की ते स्किनवर बेसनाचा पॅक लावतात. बेसनाचा पॅक बनवण्यासाठी त्यात कच्चे दूध, हळद, लिंबू, गुलाब पाणी किंवा पाणी आवश्यक आहे. हे सर्व मिक्स करुन पेस्ट बनवा आणि अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा, नंतर चेहरा धुवा. बेसन हे एक उत्तम एक्सफोलिएटर आहे. दूध आणि लिंबू मधील लॅक्टिक अॅसिड हे ब्लीचिंग घटक आहेत. दुसरीकडे हळद हे अँटी बॅक्टेरियल आहे, ज्यामुळे तुम्हाला मुरुमांपासून आराम मिळेल.

संत्र्याच्या सालीची पावडर

संत्र्याच्या सालीची पावडर देखील एक अतिशय लोकप्रिय उपाय आहे. संत्र्याची साल वाळवून बारीक करा. त्यानंतर कच्च्या दुधात त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि चमकही येते. संत्र्यातील सायट्रिक अॅसिड त्वचेला उजळ करते.

नारळाचे तेल

त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येमध्ये नारळाचे तेल खूप फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही खोबरेल तेल लावू शकता. त्वचा ऑइली असेल तर व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग