मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  लग्नानंतरही टिकवा चेहऱ्यावरचा ग्लो, पहा कसा येईल नॅचरल ग्लो

लग्नानंतरही टिकवा चेहऱ्यावरचा ग्लो, पहा कसा येईल नॅचरल ग्लो

May 21, 2022, 01:22 PM IST

    • केवळ लग्नासाठीच चेहऱ्याची काळजी घेऊ नका, तर लग्नानंतरही चेहऱ्याची काळजी घ्या आणि ग्लो कायम ठेवा. यासाठी सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला लग्नानंतरही परफेक्ट ग्लो मिळेल.
लग्नानंतर चेहऱ्यावरचा ग्लो टिकवण्यासाठी ब्युटी टिप्स

केवळ लग्नासाठीच चेहऱ्याची काळजी घेऊ नका, तर लग्नानंतरही चेहऱ्याची काळजी घ्या आणि ग्लो कायम ठेवा. यासाठी सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला लग्नानंतरही परफेक्ट ग्लो मिळेल.

    • केवळ लग्नासाठीच चेहऱ्याची काळजी घेऊ नका, तर लग्नानंतरही चेहऱ्याची काळजी घ्या आणि ग्लो कायम ठेवा. यासाठी सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे तुम्हाला लग्नानंतरही परफेक्ट ग्लो मिळेल.

चेहरा ग्लो करत आहे! हे असे जादूचे शब्द आहेत जे कोणत्याही स्त्रीला स्वतःबद्दल खूप छान वाटू शकतात, खासकरून जर तुमचे नवीन नवीन लग्न झाले असेल. प्रत्येक नवरी आपल्या लग्नाआधी स्किनकेअरसाठी काय करावे आणि काय करू नये याचे सखोल रिसर्च करते आणि नवीन रूटीन बनवून तिच्या चेहऱ्याची काळजी घेते. पण लग्नाचा दिवस आला की सगळी कामं आटोपल्यावर सगळे रुटीन सुटून जातात. लग्नाच्या कामाचा थकवा कधी कधी नवविवाहित वधूच्या चेहऱ्यावर दिसतो आणि नैसर्गिक चमक नाहीशी होते. पण ही परिस्थिती टाळता येऊ शकते आणि लग्नानंतरही ग्लो मिळवता येतो. तुम्हाला फक्त या सोप्या टिप्सचे पालन करायचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Summer Heat Wave: कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या शरीरातील उष्णतेपासून कशी मिळेल सुटका

Ice Facial: चेहऱ्याची चमक वाढवण्याऐवजी सौंदर्य हिरावून घेऊ शकते आईस फेशियल, हे आहेत चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे दुष्परिणाम

Onion Paratha Recipe: रेगुलर बटाट्याऐवजी आज नाश्त्यात बनवा कांद्याचा पराठा, जाणून घ्या रेसिपी!

World Tuna Day 2024: जागतिक टूना दिवस का साजरा करतात? जाणून घ्या टूना माशांबद्दल मनोरंजक माहिती!

१. लग्नानंतर नवीन सुनेला अनेक लोकांना भेटावे लागते. यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा मेकअप करावा लागेल. नॉन-कॉमेडोजेनिक क्लीन्सर आणि मॉइश्चरायझर वापरा. शक्यतो ऑइल फ्री व्हेरिएंटचा वापर करा.

२. लग्नापूर्वी ज्याप्रमाणे कोणताही नवीन ब्रँड वापरू नये, त्याचप्रमाणे लग्नानंतरही नवीन ब्रँडपासून दूर राहा. कधीकधी नवीन उत्पादनामुळे त्वचेवर रॅशेस किंवा एलर्जी होऊ शकते.

३. लग्नानंतर काही दिवस खाण्यापिण्यात बदल होऊ शकतो. जो पण भेटायला येतो तो फक्त मिठाई किंवा तेलात बनवलेले हेवी फूड खायला देतात. अशा परिस्थितीत, मल्टी-व्हिटॅमिन घ्या जे तुमची त्वचा आतून चमकण्यास मदत करेल.

४. लग्नात मेकअप, रात्री उशिरा जागरण, तळलेले अन्न हे असते. हे सर्व सहजपणे डार्क सर्कल आणि थकलेल्या स्किनचे कारण बनू शकते. यामुळे तुम्ही थकलेले आणि सुस्त दिसाल. दर तासाला एक ग्लास पाणी पिल्याने ते कमी करता येईल. यामुळे तुम्हाला जास्त वेळा टॉयलेटला जावं लागू शकते, पण हे स्किनसाठी खूप फायदेशीर असते.

५. तुमच्या स्पेशल दिवसापूर्वी वॅक्सिंग आणि थ्रेडिंग केल्याने त्वचेवर रॅशेस आणि गाठा येऊ शकतात. ज्यामुळे तुमची लग्नानंतरची चमक नष्ट होऊ शकते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या बाबतीत असे आहे, तर झोपण्यापूर्वी कॅलामाइन लोशन लावा.

६. गुलाबाच्या पाकळ्यांसह घरगुती फेस पॅक बनवण्याचा प्रयत्न करा, जो खूप फायदेशीर आहे. तेलकट त्वचेसाठी गुलाबाच्या काही पाकळ्या दुधात बारीक करून घ्या आणि कोरड्या त्वचेसाठी मिल्क क्रीमने फेस पॅक लावून २० मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. गुलाब आणि दुधामुळे त्वचा चमकते.

७. तुमचे सर्व मेकअप ब्रशेस साफ करणे आवश्यक आहे. एकदा का तुम्हाला स्वच्छ ब्रश वापरण्याची सवय लागली की तुमची त्वचा तुम्हाला एक चमक देईल. स्वच्छ, सॅनिटाइज्ड ब्रश नेहमी उपयुक्त असतात आणि तुम्ही मेकअप करता तेव्हा तुमच्या त्वचेला त्रास देत नाही.

८. फेशियल करा. लग्नाच्या सर्व फंक्शन्सनंतर फेशियल करा. यामुळे चेहऱ्यावर वारंवार मेकअप करण्यापासूनही आराम मिळेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)