मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'वाय'साठी पुण्यातील महिला प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

'वाय'साठी पुण्यातील महिला प्रेक्षकांचा मुक्ता बर्वेला पाठिंबा

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 26, 2022, 08:35 AM IST

    • पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे.
‘Y’ (HT)

पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे.

    • पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे.

काळजाचा ठोका चुकवणारा 'वाय' हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा प्रीमियर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत पार पडले. काही दिवसांपूर्वी हातात मशाल धरलेले मुक्त बर्वे हिचे एक थरारक पोस्टर झळकले होते. याचा नेमका अर्थ काय, यावर अनेक चर्चाही झाल्या. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले असून या विषयाचे समर्थन करत पुण्यातील एका शोदरम्यान काही महिला प्रेक्षकांनी या विषयाला, मुक्ताला तिच्या या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे 'वाय'चा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असल्याचा हा संकेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

मुक्ता बर्वे या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत म्हणते, " समाजात घडणाऱ्या एका ज्वलंत विषयवार भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो किंवा मग आपण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतो. त्यामुळे या घटना समाजापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा विषय आम्ही प्रेक्षकांपर्यंत आणला आहे. प्रेक्षकांकडून, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून, समीक्षकांनच्या मिळणाऱ्या प्रतिक्रया पाहून हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला असून चित्रपटाच्या विषयांचे गांभीर्य लोकांच्या लक्षात येत आहे आणि हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, असे मी समजते.

या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले असून पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत. या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक, रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'वाय'ची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत.

विभाग