मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved Box Office Collection: दुसऱ्या आठड्यातही ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जमवला ‘इतका’ गल्ला!

Ved Box Office Collection: दुसऱ्या आठड्यातही ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जमवला ‘इतका’ गल्ला!

Jan 13, 2023, 02:34 PM IST

    • Ved Box Office Collection: अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने तिकीट बारीवर देखील आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपलं स्थान टिकवून राहिला आहे.
Ved Box Office Collection

Ved Box Office Collection: अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने तिकीट बारीवर देखील आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपलं स्थान टिकवून राहिला आहे.

    • Ved Box Office Collection: अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने तिकीट बारीवर देखील आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपलं स्थान टिकवून राहिला आहे.

Ved Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसुजा-देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक बड्या बड्या चित्रपटांना ‘वेड’ने मागे टाकले आहे. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने तिकीट बारीवर देखील आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपलं स्थान टिकवून राहिला आहे. दोन आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

सलग १४व्या दिवशी या चित्रपटाने १.५३ कोटींची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाने एकूण ४०.१७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतील सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘सैराट’ या चित्रपटाने आजवर प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांचे कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केले होते. मात्र, या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढत ‘वेड’ चित्रपटाने ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा बहुमान आपल्या नावे केला आहे. ‘वेड' या चित्रपटाने एका दिवसांत ५.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘वेड’ पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला या चित्रपटाने वेड लावलंय, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. ‘वेड’ या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा तीन व्यक्ती, संसार आणि प्रेम याभोवती गुंफली गेली आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टी पुरेपूर पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह या चित्रपटाचा आस्वाद घेतला आहे.

‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.