मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved Twitter Review: आता आम्हालाही ‘वेड’ लागलंय; रितेश-जिनिलीयाच्या जोडीला चाहत्यांची पसंती!

Ved Twitter Review: आता आम्हालाही ‘वेड’ लागलंय; रितेश-जिनिलीयाच्या जोडीला चाहत्यांची पसंती!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2023 03:37 PM IST

Ved Twitter Review: ‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने काही ठिकाणी हाऊसफुलचा बोर्ड झळकावला आहे.

Ved Twitter Review
Ved Twitter Review

Ved Twitter Review: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या जोडीचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट आज (३० डिसेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने काही ठिकाणी हाऊसफुलचा बोर्ड झळकावला आहे. रितेश आणि जिनिलीयाच्या प्रेमकथेसोबतच ‘वेड’ या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळाली आहे. अनेक वर्षांनी रितेश-जिनिलीया एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले आहेत.

‘वेड’ या मराठी चित्रपटातून जिनिलीया डिसुजा-देशमुख मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. तर, अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता प्रेक्षक देखील या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेकांनी हा चित्रपट पाहिला असून, सोशल मीडियावर ‘वेड’ हा चित्रपट कसा वाटला ते सांगत आहेत. अनेकांनी हा चित्रपट आपल्या खूप आवडल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी या चित्रपटाला ‘सर्कस’ फ्लॉप झाल्यामुळे फायदा मिळाल्याचे म्हटले आहे.

रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले की, ‘वेड अतिशय अप्रतिम चित्रपट. आम्हाला देखील या चित्रपटाने वेड लावलंय’. तर एका चाहत्याने लिहिलं की, ‘रितेश आणि जिनिलीया तुम्हा दोघांचं अभिनंदन. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, कोरिओग्राफ आणि अभिनय करणे सोपे नव्हते. पण तुम्ही ते खूप उत्तमरित्या हाताळले आहेत. तुमच्या वडिलांनाही तुमचा अभिमान वाटला असता.’ काही जणांनी हा चित्रपट आपल्या भागात हाऊसफुल झाल्याचे म्हटले आहे.

‘वेलकम बॅक क्वीन’ म्हणत चाहते जिनिलीयाचं कौतुक करत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलीया मोठ्या पडद्यावर परतली आहे. 'वेड' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले आहे. या चित्रपटात रितेशसोबत जिनिलीया, अशोक सराफ, शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. अजय-अतुल या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘वेड’ हा चित्रपट आज (३० डिसेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

IPL_Entry_Point