मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: जॉन अब्राहम अन् शाहरुख खानमध्ये बिनसलं? ‘पठाण’च्या प्रमोशनवरही होतोय परिणाम

Pathaan: जॉन अब्राहम अन् शाहरुख खानमध्ये बिनसलं? ‘पठाण’च्या प्रमोशनवरही होतोय परिणाम

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 13, 2023 11:45 AM IST

John Abraham On Pathaan: जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्येही त्याने शाहरुख खानचा उल्लेख करणं टाळलं आहे.

John-Shah Rukh Khan
John-Shah Rukh Khan

John Abraham On Pathaan: अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ हा या वर्षातील पहिला बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटातून शाहरुख तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. मात्र, या दरम्यान शाहरुख खान आणि जॉन यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. जॉन अब्राहम या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही दिसत नाहीये.

दरम्यान, जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्येही त्याने शाहरुख खानचा उल्लेख करणं टाळलं आहे. यामुळेच आता त्यांच्यातील वादांच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. जॉनने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘इतक्या वर्षांमध्ये हा क्षण सर्वात खास आहे. पठाणच्या ट्रेलरवर तुम्ही एवढ्या प्रेमाचा वर्षाव केला, हे पाहून खूप आनंद झाला. हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. ही मोठी गोष्ट आहे.’

John Abraham On Pathaan
John Abraham On Pathaan

जॉनने पुढे लिहिले की, ‘आदित्य चोप्राने मला माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्कृष्ट भूमिका दिल्या आहेत. आता या चित्रपटात आम्ही काय धमाल केली आहे, हे दाखवण्यासाठी आणखी वात बघू शकत नाही. मला पठाणबद्दल खूप काही सांगायचे आहे, पण तूर्तास २५ जानेवारीपर्यंत थांबतो. मोठ्या पडद्यावर उत्तम मनोरंजनासाठी सज्ज व्हा. ट्रेलरला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.’

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

IPL_Entry_Point