मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urmila Matondkar: आठ वर्षांनंतर उर्मिला मराठी चित्रपटात; म्हणाली, कथा ऐकताक्षणीच…

Urmila Matondkar: आठ वर्षांनंतर उर्मिला मराठी चित्रपटात; म्हणाली, कथा ऐकताक्षणीच…

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 16, 2022, 01:58 PM IST

    • Urmila Matondkar In Marathi Film: उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
Urmila Matondkar

Urmila Matondkar In Marathi Film: उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

    • Urmila Matondkar In Marathi Film: उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा मराठी सिनेमात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

tee mee navhech: बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही चित्रपट तिचे हिट ठरले आहे. तिने ‘माधुरी, ‘आजोबा’ अशा मराठी चित्रोटांमध्येही काम केले आहे. त्यानंतर ती मराठी चित्रपटांमध्ये दिसली नाही. आता ती जवळपास ८ वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपटात दिसणार आहे. तेही अभिनेता श्रेयस तळपदेसोबत.

ट्रेंडिंग न्यूज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

उर्मिला पुनरागम करत असलेल्या या चित्रपटाचे नाव 'ती मी नव्हेच' असे आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर श्रेयस तळपदे, निनिद कामत या कलाकारांच्याही भूमिका आहेत. पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पण हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

<p>ती मी नव्हेच</p>

एका मोठ्या कालावधीनंतर मराठीमध्ये पुनरागमन करणाऱ्या उर्मिला मातोंडकरने म्हटले की, “चित्रपटाची कथा ऐकताच क्षणी मला भावली. यासाठी मी पारितोषला नकार देऊच शकले नसते. ‘ती मी नव्हेच’च्या माध्यमातून पारितोष सोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदे सारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे.”

विभाग