मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर झाली आई? फोटो पाहून चर्चांना उधाण

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर झाली आई? फोटो पाहून चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 15, 2022 08:27 AM IST

उर्मिलाचा पती मोहसिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन उर्मिला आई झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकर (HT)

बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिला ही खासगी आयुष्मामुळे सतत चर्चेत असते. नुकताच उर्मिलाचा पती मोहसिन अख्तरने सोशल मीडियावर एका छोट्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटोपाहून उर्मिला आई झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मोहसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका छोट्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘वॉव.. छोटी परी.. तू माझ्या हृदयावर राज्य करून वर्ष पूर्ण झालं आहे आणि हे वर्ष खूपच उत्साहपूर्ण होतं. छोटी परी आयराला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले होते. त्यामुळे उर्मिला आणि मोहसिनने एका मुलीला दत्तक घेतले की काय? या चर्चांना उधाण आले आहे.
वाचा: चिमुकलीचा 'सामी'वर भन्नाट डान्स, रश्मिकाने व्यक्त केली भेटण्याची इच्छा

मोहसिनच्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तुमची मुलगी गोड आहे असे म्हटले आहे. या सगळ्या कमेंट पाहून मोहसिनने फोटोला दिलेले कॅप्शन एडिट केले आहे. त्याने 'माझी सुंदर पुतणी आयरा' असे लिहिले आहे. ते पाहून ही मुलगी त्यांची नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यापाठोपाठ उर्मिलाने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या व्हायरल फोटोविषयी वक्तव्य केले. ती म्हणाली ती मुलगी पुतणी आहे असे स्पष्ट केले. “आयरा ही माझ्या भावाची मुलगी आहे. मलासुद्धा अनेकांनी मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी फोटोचे कॅप्शन एडिट केले” असे उर्मिला म्हणाली.

उर्मिलाने सहा वर्षांपूर्वी मोहसिनशी लग्न केले आहे. ३ मार्च २०१६ रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही मोजक्याच लोकांनी लग्नाला हजेरी लावली होती. उर्मिलाने लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली होती.

IPL_Entry_Point

विभाग