मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'वेडात वीर दौडले सात' मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची वर्णी; पहिल्यांदाच झळकणार ऐतिहासिक भूमिकेत!

'वेडात वीर दौडले सात' मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची वर्णी; पहिल्यांदाच झळकणार ऐतिहासिक भूमिकेत!

Feb 14, 2023, 02:41 PM IST

    • Madhuri Pawar : माधुरी पवार लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
Madhuri Pawar

Madhuri Pawar : माधुरी पवार लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

    • Madhuri Pawar : माधुरी पवार लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Madhuri Pawar in Vedat Marathe Veer Daudale Saat: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘नंदिता वहिनी’ अर्थात ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री माधुरी पवारने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत 'टाइप कास्ट' न होता आपल्या दमदार अभिनयातून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. आता माधुरी पवार लवकरच महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

‘राणा दा’ आणि ‘पाठक बाई’ यांच्या जोडीसोबतच या मालिकेतील नंदिता वहिनी हे पात्र देखील तुफान गाजलं. मालिकेच्या सुरुवातीला हे पात्र अभिनेत्री धनश्री काडगाववर हिने साकारलं होतं. मात्र, धनश्री प्रसूती रजेवर गेल्यानंतर तिच्या जागी माधुरी पवार हिची वर्णी लागली. माधुरीने देखील या पात्रातून घराघरांत लोकप्रियता मिळवली. 'महाराष्ट्राची महाअप्सरा' अशी ओळख असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्याबरोबरच छोट्या पडद्यावरील 'वाहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा असो की, 'रानबाजार' वेब सीरिजमधील राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील सानेची भूमिका माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे.

आता माधुरी पवार, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित, मराठी-हिंदीसह पाच भाषांमध्ये निर्मिती होत असलेल्या 'वेडात वीर दौडले सात' या भव्य ऐतिहासिक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे. माधुरी पवार नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी मात्र तिच्या चाहत्यांना काही काळ वाट बघावी लागणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपट, मराठी कथानक आणि अनेक मराठी कलाकारांची फौज असून, अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटातून अक्षय मराठीत पदार्पण करणार आहे.