मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'रानबाजार' नंतर माधुरी पवारच्या ठसकेबाज लावणीची चर्चा

'रानबाजार' नंतर माधुरी पवारच्या ठसकेबाज लावणीची चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 26, 2022 03:04 PM IST

माधुरी पवारनं या धमाल गाण्यावर ठुमके लगावले आहेत. पाहा व्हिडीओ

लाल मोठी गाडी
लाल मोठी गाडी (HT)

‘रानबाजार’ या सीरिजमुळे सध्या जोरदार चर्चेत असलेली अभिनेत्री, नृत्यांगना म्हणजे माधुरी पवार. माधुरी आता 'आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी' असे धमाल शब्द असलेल्या 'लाल मोठी गाडी' या नव्या म्युझिक व्हिडीओतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच हा व्हिडीओ सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे. माधुरी पवारनं या धमाल गाण्यावर ठुमके लगावले आहेत.

'लाल मोठी गाडी' या गाण्याचं लेखन माधवी देवळणकर यांनी केलं आहे, तर अमेय मुळे यांचं संगीत असलेलं हे गाणं लरिसा अल्मेडा या नव्या गायिकेनं गायलं आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

ठसकेदार आणि दिमाखदार अशी ही लावणी नव्या ढंगातली आहे. धमाल शब्द आणि उडती चाल असलेलं हे गाणं लगेचंच ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं. सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत कोळीगीत, प्रेमगीत असे वेगवेगळे म्युझिक व्हिडिओ सादर केले आहेत. त्यात आता लाल मोठी गाडी या लावणी म्युझिक व्हिडिओची भर पडत आहे. आजवरच्या म्युझिक व्हिडिओंना मिळालेल्या दमदार प्रतिसादाप्रमाणेच लाल मोठी गाडीसुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही.

IPL_Entry_Point