मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dhishkyaoon : 'ढिशक्यांव' चित्रपटाच्या वादात गौतमी पाटील पुन्हा एकदा झाली ट्रोल! नेमकं प्रकरण काय?

Dhishkyaoon : 'ढिशक्यांव' चित्रपटाच्या वादात गौतमी पाटील पुन्हा एकदा झाली ट्रोल! नेमकं प्रकरण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 14, 2023 01:29 PM IST

Dhishkyaoon Controversy: ‘ढिशक्यांव’ चित्रपट प्रदर्शनानंतर मात्र काही लोकांनी चित्रपटाची वाहवा न करता त्याची निंदा केली आहे. यावरूनच आता वाद सुरू झाला आहे...

Dhishkyaoon
Dhishkyaoon

Dhishkyaoon Controversy: सध्या मराठी चित्रपटसृष्टीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात भर घालण्यास सध्या ‘ढिशक्यांव’ चित्रपटही आला आहे. 'ढिशक्यांव' चित्रपट रिलीज झाल्यापासून त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडले आहे. तर, कलाकारांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. चित्रपट प्रदर्शनानंतर मात्र समाजातील काही लोकांनी चित्रपटाची वाहवा न करता त्याची निंदा केली आहे. चित्रपट अडल्ट असल्याचे म्हणत काहींनी चित्रपटाची लोकप्रियता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व विधानांवर भाष्य करत असताना चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि निर्माता अहेमद देशमुख म्हणाला की, ‘मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने हा चित्रपट बनवलाय त्याचे कौतुक न करता, मराठी चित्रपटांवर भाष्य करण्यात मराठीतील पाय खेचणाऱ्यांना काय समाधान मिळते तेच कळत नाही. त्यांना हिंदी चित्रपटातील नंगा नाच महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला चालतो. मात्र, मराठमोळ्या निर्मात्याने सर्व पणाला लावून निर्मित केलेला चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाहीतर काय राज्या बाहेर होणार का?’ हिंदी चित्रपटातील नंगा नाच चालतो, गौतमी पाटील नाचलेली चालते हे सगळं कसं चालतं, असे म्हणत त्याने थेट गौतमी पाटीलवर वक्तव्य केलंय.

गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण सर्वांनाच ज्ञात आहे. तिने लावणीला बदनाम केल्याचा आरोप समाजातील लावणी कलावंत आणि आता राजकारणीही करू लागलेत. अशातच 'ढिशक्यांव' चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता अहेमद देशमुखनेही लावणीक्वीन गौतमी पाटीलचं उदाहरण देत तिला ट्रोल केलंय. तसेच, चित्रपटाची निंदा करणाऱ्या लोकांना त्याने प्रतिउत्तर करत खडेबोल लगावलेत. जर 'ढिशक्यांव' चित्रपटात अडल्ट सीन असेल तर मी आताच्या आता हा सिनेमा खाली उतरवायला लावतो, असे म्हणत त्याने थेट निंदा करणाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय.

दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव' हा चित्रपट असून निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे.

IPL_Entry_Point