मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhav Abhyankar: 'अण्णा नाईक' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिका नाही तर चित्रपटातून

Madhav Abhyankar: 'अण्णा नाईक' येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिका नाही तर चित्रपटातून

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 14, 2023 12:10 PM IST

Madhav Abhyankar Upcoming movie: या चित्रपटात माधव अभ्यंकरसोबत चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री सायली संजीव, रसिका सुनील, नितीश चव्हाण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

माधव अभ्यंकर
माधव अभ्यंकर (HT)

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले ’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेचे दोन्ही सिझनही विशेष गाजले. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. विशेष म्हणजे अण्णा नाईक ही भूमिका साकारणारे माधव अभ्यंकर सतत चर्चेत होते. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळत होते. आता माधव अभ्यंकर एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

माधव अभ्यंकरच्या आगामी चित्रपटाचे नाव "उर्मी" असे आहे. उत्तम कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या "उर्मी" या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने लाँच करण्यात आले.
वाचा: आकाश ठोसर कोणासोबत करतोय रोमॅन्स?

अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री सायली संजीव, रसिका सुनील, नितीश चव्हाण आणि माधव अभ्यंकर अशी तगडी स्टारकास्ट "उर्मी" या चित्रपटात आहे. "उर्मी" या चित्रपटात दोन अभिनेत्री असून पुढे आता काय घडणार यासाठी अजून जरा वाट पहावी लागणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट महिला केंद्रित असल्याचं जाणवतं.

समृद्धी क्रिएशनच्या डॉ. प्रवीण दत्तात्रय चौधरी यांनी "उर्मी" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनीच चित्रपटासाठी कथा आणि गीतलेखनही केलं आहे. डॉ. चैताली प्रवीण चौधरी आणि मालतीबाई दत्तात्रय चौधरी यांनी चित्रपटाची सहनिर्माती केली आहे. राजेश बालकृष्ण जाधव यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चौधरी यांनी संगीत, कौशल गोस्वामी यांनी छायांकन अनंत मारुती कामत यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे तर महेश गोपाळ भारंबे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग