मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudh: साडी अन् वेणीत दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, मालिकेत नवे वळण

Tu Chal Pudh: साडी अन् वेणीत दिसणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 28, 2023, 08:40 AM IST

    • Tu Chal Pudh: 'तू चाल पुढं' मालिकेतील वाघमारेंच्या सुनेचा नवा प्रवास सुरु झाला. तिच्या या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तू चाल पुढं (HT)

Tu Chal Pudh: 'तू चाल पुढं' मालिकेतील वाघमारेंच्या सुनेचा नवा प्रवास सुरु झाला. तिच्या या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    • Tu Chal Pudh: 'तू चाल पुढं' मालिकेतील वाघमारेंच्या सुनेचा नवा प्रवास सुरु झाला. तिच्या या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री दीपा परब हिने जवळपास १४ वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' या मालिकेतून मराठीत कमबॅक केलं. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

'तू चाल पुढं' या मालिकेत आपण नेहमी साधी सरळ अश्विनी पाहिली आहे. जी साडी नेसून वेणी घालून फिरते. आता प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु होतोय. अश्विनी आता एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.
वाचा: बिग बॉस १६मधील 'हा' स्पर्धक दिसणार बिग ब्रदर UKमध्ये

प्रोमोमध्ये सगळ्यांनी ग्लॅमरस अश्विनीला पाहिलं, अश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा नवीन प्रवास सुरु होतोय. अश्विनी ‘मिस इंडिया २०२३’ मध्ये भाग घेऊन एक नवीन प्रवासाकडे वळणार आहे. अश्विनीला या नवीन रूपात पाहणे रोमांचक असणार आहे. आता अश्विनीला गरज आहे तुमच्या आशिर्वादाची.

विभाग