मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: बिग बॉस १६मधील 'हा' स्पर्धक दिसणार बिग ब्रदर UKमध्ये
बिग बॉस १६
बिग बॉस १६ (HT)

Bigg Boss 16: बिग बॉस १६मधील 'हा' स्पर्धक दिसणार बिग ब्रदर UKमध्ये

25 January 2023, 15:34 ISTAarti Vilas Borade

Bigg Boss 16: कोण आहे हा स्पर्धक हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. जाणून घ्या सविस्तर..

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक कलाकार हे प्रेक्षकांची मने जिंकत असतात. स्पर्धकांचे बिग बॉसच्या घरातील वागणे, त्यांचे राहाणे प्रेक्षक पाहात असतात. सध्या बिग बॉसचे १६ वे पर्व चर्चेत आहे. आता या पर्वातील एक स्पर्धक बिग ब्रदर यूकेमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बिग बॉस यूकेमध्ये सहभागी होणारा हा स्पर्धक कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून क्यूट स्माइल देणारा अब्दू रोजिक आहे. एक काळ असा होता जेव्हा अब्दू रस्त्यावर गाणे गाऊन पैसे जमा करत असे. पण आता त्याचे आयुष्य बदलले आहे. त्याने मेहनतीने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने बिग बॉस १६चे पर्व गाजवले.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया स्टार अब्दू रोजिकला बिग ब्रदर यूकेच्या आगामी सिझनची ऑफर आली आहे. इतकच काय तर अब्दूने ही ऑफर स्विकारली देखील आहे. जून किंवा जुलैमध्ये अब्दू या शोमध्ये सहभागी होण्यास रवाना होणार आहे. जवळपास पाच वर्षांनंतर बिग ब्रदर यूके रिबूट सीक्वेंस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अब्दू बिग बॉस १६मध्ये दिसला होता. त्याची आणि शिव ठाकरेची मैत्री कायम चर्चेचा विषय ठरली होती. पण काही दिवसांपूर्वीच अब्दूला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला होता. आता तो बिग ब्रदरमध्ये दिसणार असल्यामुळे चाहते खूश झाले आहेत.

विभाग