मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taraka Ratna: ज्युनियर एनटीआरच्या भावाची प्रकृती खालावली; तारक रत्न अजूनही कोमामध्येच!

Taraka Ratna: ज्युनियर एनटीआरच्या भावाची प्रकृती खालावली; तारक रत्न अजूनही कोमामध्येच!

Jan 30, 2023, 09:43 AM IST

    • Taraka Ratna health Update: तारक रत्न यांना गेल्या शुक्रवारी एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Tarak Ratna

Taraka Ratna health Update: तारक रत्न यांना गेल्या शुक्रवारी एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    • Taraka Ratna health Update: तारक रत्न यांना गेल्या शुक्रवारी एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Taraka Ratna health Update: साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर याचा भाऊ अभिनेता तारक रत्न यांची प्रकृती खालावली आहे. एका प्रचार सभेत सामील झालेल्या तारक रत्न याला सभेदरम्यान हार्टअटॅक आला होता. तारक रत्न यांना गेल्या शुक्रवारी एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते अचानक बेशुद्ध झाल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले, त्यानंतर ते कोमात गेले.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, तारक रत्न यांचे चुलत भाऊ ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बंगळुरू येथील रुग्णालयात पोहोचले होते. अभिनेते तारक रत्न त्यांचे चुलत भाऊ नारा लोकेश यांच्या पदयात्रेत सामील होण्यासाठी आला होता. यादरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले आणि तत्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अभिनेते तारक रत्न हे दिग्गज अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नंदामुरी तारक रामाराव यांचे नातू आहेत. तारक रत्न यांनी २००३मध्ये आलेल्या 'ओकाटो नंबर कुर्राडू' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी ओटीटीवरही धमाकेदार पदार्पण केले होते.

सध्या तारक रत्न रुग्णालयात दाखल आहेत. ते कोमात गेले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्याला रुग्णालयात भेटण्यासाठी नातेवाईक आणि चाहत्यांनी गर्दी केली आहे. नंदामुरी कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात आहेत, तर अनेक राजकारणी देखील अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत आहेत. त्याच वेळी, सोशल मीडियावरही चाहते सतत अभिनेत्याच्या लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत.

विभाग