मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव माहितीये का? जाणून घ्या
ज्युनिअर एनटीआर
ज्युनिअर एनटीआर (HT)
20 May 2022, 4:28 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 4:28 AM IST
  • आज ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी खास गोष्टी

अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ज्युनिअर एनटीआर ओळखला जातो. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट होताना दिसतो. आज २० मे रोजी ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी..

ट्रेंडिंग न्यूज

ज्युनिअर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ साली हैदराबादमध्ये झाला. तो दाक्षिणात्य सुपरस्टार एन. टी. रामाराव यांचा नातू आहे. ज्यूनिअर एनटीआरने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्याने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मर्षि विश्वामित्र’ या चित्रपटात काम केले. पण तुम्हाला ज्युनिअर एनटीआरचे खरे नाव माहिती आहे का? एन.टी. रामा राव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्याला ही नवीन ओळख मिळाली होती. परंतु ज्युनिअर एनटीआरचे खरे नाव तारक असे आहे.

ज्युनिअर एनटीआरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला अभिनयासोबतच डान्सची देखील आवड आहे. तो एक ट्रेड डान्सर आहे. त्याला कुचिपूडी डान्सदेखील येतो.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook