मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth Malhotra and Kiara Advani: सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी चाहत्यांना ‘ती’ गुडन्यूज देणार?

Sidharth Malhotra and Kiara Advani: सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी चाहत्यांना ‘ती’ गुडन्यूज देणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2023 08:32 AM IST

Sidharth Malhotra and Kiara Advani: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपण आज एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.

Sidharth Malhotra and Kiara Advani
Sidharth Malhotra and Kiara Advani

Sidharth Malhotra and Kiara Advani: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ येत्या ६ फेब्रुवारीला अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत लग्न करणार आहे. मात्र, दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान आज सिद्धार्थ चाहत्यांना हीच गुडन्यूज देण्याची शक्यता आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपण आज एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या लग्नाबद्दल कयास बांधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सिद्धार्थ आणि कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दलची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर, दुसरीकडे काही चाहत्यांना हा त्यांचा प्रमोशन फंडा वाटत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी एक मोठी घोषणा करणार आहे. आज काहीतरी मोठे आणि मनोरंजक घडणार आहे!’ सिद्धार्थच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर कुजबुज सुरू झाली आहे. या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करून लिहिले की, ‘कृपा करून एखाद्या नव्या जाहिरातीची वैगरे घोषणा करू नका. कियारानेही काही दिवसांपूर्वी अशीच पोस्ट पोस्ट केली होती आणि नंतर ती पोस्ट एका एका ब्युटी ब्रँडची जाहिरात निघाली. आम्ही तुमच्या लग्नाच्या घोषणेची वाट पाहत आहोत. आता त्याबद्दल खुलासा करा.’

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. या जोडप्याचे प्री-वेडिंग सोहळे ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहे. तर, ६ फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहेंदी, हळद आणि संगीता या सगळ्या कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने शेरशाह या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग