मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth Malhotra Birthday: चित्रपटांमध्ये झळकण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा करायचा ‘हे’ काम!

Sidharth Malhotra Birthday: चित्रपटांमध्ये झळकण्यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा करायचा ‘हे’ काम!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 16, 2023 07:24 AM IST

Happy Birthday Sidharth Malhotra: बॉलिवूडचा ‘शेरशहा’ अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घ्या त्याच्याबद्दल काही खास गोष्टी....

Sidharth Malhotra
Sidharth Malhotra

Happy Birthday Sidharth Malhotra: बॉलिवूडचा ‘शेरशहा’ अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज (१६ जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सिद्धार्थ मल्होत्राने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. इतकेच नाही तर, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्याने मनोरंजन विश्वात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सिद्धार्थला बराच काळ संघर्ष करावा लागला होता.

ट्रेंडिंग न्यूज

सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म १६ जानेवारी १९८५ रोजी दिल्लीत झाला. त्याने आपले संपूर्ण शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमधून बीकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सिद्धार्थ मल्होत्राने वैयक्तिक खर्चासाठी मॉडेलिंग सुरू केले. परंतु, नंतर त्याने बराच काळ मॉडेलिंगच्या दुनियेत काम केले.

सिद्धार्थ मल्होत्रा हा मॉडेलिंग विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सिद्धार्थने भारतातच नाही, तर परदेशातही मॉडेलिंग केले आणि खूप नाव कमावले. अनेक वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर सिद्धार्थने अखेर चित्रपटाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अभिनेता म्हणून नव्हे तर, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्या दरम्यानच्या काळात सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत ‘फॅशन’ या चित्रपटात दिसणार होता. पण, या चित्रपटात त्याची संधी हुकली.

यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरसोबत 'माय नेम इज खान' या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये केले होते. त्यानंतर २०१२मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातून अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनीही त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने 'एक व्हिलन', 'ब्रदर','इत्तेफाक' आणि ‘शेरशहा’सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग