मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sur Nava Dhyas Nava: ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता ठरला उत्कर्ष वानखेडे

Sur Nava Dhyas Nava: ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता ठरला उत्कर्ष वानखेडे

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 26, 2022, 08:38 AM IST

    • Utkarsh Wankhede: संज्योती जगदाळे ही ‘सूर नवा ध्यास नवा’ची उपविजेती ठरली आहे.
उत्कर्ष वानखेडे (HT)

Utkarsh Wankhede: संज्योती जगदाळे ही ‘सूर नवा ध्यास नवा’ची उपविजेती ठरली आहे.

    • Utkarsh Wankhede: संज्योती जगदाळे ही ‘सूर नवा ध्यास नवा’ची उपविजेती ठरली आहे.

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. उत्कर्ष वानखेडे याने राजगायक होण्याचा मान पटकावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात १५ ते ३५ वयोगटातील फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
वाचा : “सैराट २ येणार?", रिंकू राजगूरुचा मोठा खुलासा

१६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्द विजेतेपद जिंकण्यासाठीचे. आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी - आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. उत्कर्ष वानखेडे याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला.

उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार मिळाली तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर. संज्योती जगदाळे ठरली पहिली उपविजेती तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश, आरोही प्रभुदेसाई ठरली दुसरी उपविजेती तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश.

विभाग