मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sairat 2: “सैराट २ येणार?", रिंकू राजगूरुचा मोठा खुलासा

Sairat 2: “सैराट २ येणार?", रिंकू राजगूरुचा मोठा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2022 03:59 PM IST

Rinku Rajguru: रिंकूने 'बस बाई बस' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.

रिंकू राजगुरु
रिंकू राजगुरु (HT)

"मी घेऊन येतोय महिलांसाठी खास राखीव बस", असं सुबोध भावेने म्हणताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली ती म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व हजेरी लावत असून सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार दिसतो. या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु हजेरी लावली. त्यावेळी तिने सैराट २ विषयी खुलासा केला आहे.

रिंकूने सुबोध भावेसोबत शोमध्ये मजामस्ती केली. त्यावेळी तिला रिंकूला “’सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ती म्हणाली, “’सैराट २’ येणार की नाही याबद्दल मला माहीत नाही. शक्यतो नाही. 'सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही याबद्दल नागराज मंजुळे दादाच सांगू शकतील.”
वाचा : आमिरच्या मुलीला बॉयफ्रेंडने केले लग्नासाठी अनोखे प्रपोज, व्हिडीओ व्हायरल

सैराट हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात रिंकूसोबत आकाश ठोसर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. आता हा चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रिंकूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'झुंड' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.

IPL_Entry_Point

विभाग