मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साठीच्या उंबऱ्यावरील शाहरुखचे सिक्स पॅक्स पाहून चाहते झाले स्तब्ध! ‘पठाण’चा ट्रेलर पाहून म्हणतायत...

साठीच्या उंबऱ्यावरील शाहरुखचे सिक्स पॅक्स पाहून चाहते झाले स्तब्ध! ‘पठाण’चा ट्रेलर पाहून म्हणतायत...

Jan 10, 2023, 01:39 PM IST

    • Pathaan Trailer Reviews: ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खान याने वर्क आऊट करून सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत.
Pathaan

Pathaan Trailer Reviews: ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खान याने वर्क आऊट करून सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत.

    • Pathaan Trailer Reviews: ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खान याने वर्क आऊट करून सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत.

Pathaan Trailer Reviews: बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’ रिलीज व्हायला आता काही दिवस उरले आहेत. त्या आधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पठाण’चा ट्रेलर पाहून सगळे चाहते आता शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील नेटकरी हा ट्रेलर आपल्याला कसा वाटला यावर प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटरवर देखील लोक ट्वीट करून या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

या चित्रपटात शाहरुख खान एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खान याने वर्क आऊट करून सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत. तर, या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसली आहे. तर, अभिनेता जॉन अब्राहम ‘पठाण’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख आणि जॉनची तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. ‘पठाण’चा हा धमाकेदार ट्रेलर शाहरुख खान याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर ‘पठाण’चा ट्रेलर शेअर केला आहे. तर, चाहते देखील हा ट्रेलर शेअर करून किंग खानला धमाकेदार पुनरागमनाबद्द्ल शुभेच्छा देत आहेत.

ट्रेलरमध्ये शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खानने सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत. तर, दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसत आहे. तर, जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.