मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख खानचा ‘पठाण’ ते अजय देवगणचा ‘भोला’; IMDbच्या बहुप्रतीक्षित यादीत ‘या’ चित्रपटांचा समावेश!

शाहरुख खानचा ‘पठाण’ ते अजय देवगणचा ‘भोला’; IMDbच्या बहुप्रतीक्षित यादीत ‘या’ चित्रपटांचा समावेश!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2023 11:17 AM IST

IMDb Most awaited movies in 2023: नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आता या वर्षात अनेक नवे आणि हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

IMDb Most awaited movies in 2023
IMDb Most awaited movies in 2023

IMDb Most awaited movies in 2023: नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आता या वर्षात अनेक नवे आणि हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वर्षात अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता IMDb द्वारे २०२३च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत शाहरुख खानच्या चित्रपटांपासून ते अजय देवगणच्या चित्रपटांचा समावेश आहे. IMDbच्या मासिक २० कोटी दर्शकांच्या पेज व्ह्यूजनुसार बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा २०२३चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे.

IMDb या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजसंदर्भातील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताद्वारे आज २०२३च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा करण्यात आली. २०२३मधील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजच्या आधारे IMDbने सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी निर्धारित केली आहे.

IMDbची 2023 ची सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची यादी :

१. पठाण

२. पुष्पा: द रूल- पार्ट २

३. जवान

४. आदिपुरुष

५. सलार

६. वेरीसू

७. कब्ज़ा

८. थलापथी 67

९. द आर्चीज

१०. डंकी

११. टायगर ३

१२. किसी का भाई किसी की जान

१३. थुनिवू

१४. एनिमल

१५. एजंट

१६. इंडियन २

१७. वादीवासाल

१८. शेहज़ादा

१९. बडे मियाँ छोटे मियाँ

२०. भोला

२०२३मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी हे २० चित्रपट हे २०२२मध्ये IMDbच्या २० कोटी युजर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होते.

IPL_Entry_Point

विभाग