मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

Satish Kaushik: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 15, 2023, 05:22 PM IST

    • Satish Kaushik Death: गेल्या दोन वर्षांपासून सतीश कौशिक एका प्रोजेक्टवर काम करत होते. अचानक निधन झाल्यामुळे त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली आहे.
सतीश कौशिक (ANI) (HT_PRINT)

Satish Kaushik Death: गेल्या दोन वर्षांपासून सतीश कौशिक एका प्रोजेक्टवर काम करत होते. अचानक निधन झाल्यामुळे त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

    • Satish Kaushik Death: गेल्या दोन वर्षांपासून सतीश कौशिक एका प्रोजेक्टवर काम करत होते. अचानक निधन झाल्यामुळे त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अचानक निधन झाल्यामुळे सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

सतीश कौशिक यांची इच्छा होती की त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक प्रकाशित व्हावे. त्यासाठी ते जवळपास दोन वर्षे काम करत होते. त्यांच्या ऑटोबायोग्राफीचे प्लानिंग त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. दोन महिन्यांपासून ते या पुस्तकाची घोषण करणार होते. मात्र ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले.

सतीश कौशिक यांचा पुतण्या निशांतने त्यांच्या शेवटच्या इच्छेविषयी सांगितले आहे. काकांची इच्छा होती की त्यांच्या जीवनावरील ऑटोबायोग्राफी यावी. हरियाणा पासून ते मुंबई पर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांना दाखवायचा होता. त्यांचा अनुभव त्यांना इतरांसोबत शेअर करायचा होता. त्यांना हे सर्व किस्से पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगायचे होते. ते स्वत: हे पुस्तक लिहित होते. त्यांना जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा ते यावर काम करत. आता त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आहे.

विभाग