मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Ruth Prabhu: अभिनयच नव्हे तर गणितातही समंथा हुशार; अभिनेत्रीची मार्कशीट होतेय व्हायरल!

Samantha Ruth Prabhu: अभिनयच नव्हे तर गणितातही समंथा हुशार; अभिनेत्रीची मार्कशीट होतेय व्हायरल!

Apr 26, 2023, 02:30 PM IST

  • Samantha Ruth Prabhu Report Card Viral: समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu Report Card Viral: समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

  • Samantha Ruth Prabhu Report Card Viral: समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

Samantha Ruth Prabhu Report Card Viral: साऊथची लेडी सुपरस्टार समंथा रुथ प्रभू सध्या प्रचंड असते. समंथा कधी तिच्या फिल्म प्रोजेक्टमुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या फोटोंमुळे प्रसिद्धी झोतात येत असते. नुकताच समंथाचा 'शाकुंतलम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील समंथाच्या अभिनयाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. पण, तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान समंथाचा एक जुना फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता तिची १०वीची मार्कशीट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

समंथा रुथ प्रभू हिचे इयत्ता १०वीचे रिपोर्ट कार्ड व्हायरल झाल्यानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. व्हायरल झालेले हे रिपोर्ट कार्ड रिट्विट करून स्वतः समंथाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. समंथाच्या मार्कशीट वरील तिला मिळालेले गुण पाहून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच शालेय जीवनात ती हुशार विद्यार्थीनी असल्याचेही सिद्ध झाले आहे. या मार्कशीटमध्ये, समंथाला सर्व विषयांमध्ये ८०पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसत आहेत. परंतु, तिचे गणितातील गुण पाहून चाहते आता थक्क झाले आहेत. समंथाला गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने तिचे व्हायरल रिपोर्ट कार्ड शेअर करताना त्यावर कमेंट देखील केली आहे. व्हायरल झालेली मार्कशीट रिट्वीट करत तिने लिहिले की, 'हा हा हे पुन्हा व्हायरल झालं...'. तिच्या या कमेंटवरूनच कळत आहे की, ही तिचीच मार्कशीट आहे. यावर आता चाहते देखील कमेंट करत आहेत. समंथा रुथ प्रभूची ही मार्कशीट पाहून आता चाहते तिला ‘टॉपर’ म्हणत आहेत.

समंथाच्या या व्हायरल मार्कशीटमध्ये तिला सर्व विषयात ८०पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर, गणितात तिला १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयांत ९०पेक्षा अधिक गुण मिळालेले दिसत आहेत. नुकताच समंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आहे. तर, आता १ सप्टेंबरला समंथाचा 'ख़ुशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. सध्या ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

विभाग