मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nava Gadi Nava Rajya: ब्रेकनंतर ‘ही’ अभिनेत्री कामावर परतली! ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये धमाकेदार एन्ट्री करणार

Nava Gadi Nava Rajya: ब्रेकनंतर ‘ही’ अभिनेत्री कामावर परतली! ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये धमाकेदार एन्ट्री करणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 26, 2023 01:12 PM IST

Nava Gadi Nava Rajya Latest Update: ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आदिती सारंगधर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Aditi Sarangdhar
Aditi Sarangdhar

Nava Gadi Nava Rajya Latest Update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ सध्या एका मनोरंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता अभिनेत्री आदिती सारंगधर हिची एन्ट्री होणार आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत खलभूमिका साकारल्यानंतर आदितीने काही काळासाठी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आदिती सारंगधर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची कथा आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. आनंदी आणि राघवच्या संसारात आलेलं वादळ अद्याप शमण्याचं नाव घेत नाहीये. तर, आता आनंदीने देखील स्वतःच्या पायावर उभी राहून स्वावलंबी बनण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ती आता स्वतःची कला जोपासून मूर्ती बनवण्याचं काम करत आहे. यासाठी तिला नंदू दादाची मदत देखील मिळाली आहे. तर, वर्षा देखील या सगळ्यात आनंदीची साथ देणार आहे. आनंदीच्या याच प्रवासात आता तिला एका नव्या व्यक्तीची साथ मिळणार आहे.

Jawan : हायकोर्टाकडून शाहरुखला मोठा दिलासा; ‘जवान’च्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर!

रमा या जगातून निघून गेल्यानंतर राघव आणि चिंगी यांना सांभाळण्यासाठी कर्णिकांच्या घरात आनंदीची एन्ट्री होते. गावातून शहरांत आलेली आनंदी तिच्यासमोर येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड देऊन खंबीरपणे जगू लागली आहे. तिने आपल्या प्रेमाने सगळ्यांना आपलसं करून घेतलं आहे. तर, दुसरीकडे तिला सतत रमा दिसत असल्याचे सत्य आता राघव समोर देखील आले होते. त्यानंतर राघव आनंदीवर प्रचंड संतापला आहे. त्याने आनंदीला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं आहे.

एकटी पडलेली आनंदी आता स्वतःचा संसार नव्याने उभा करणार आहे. ती आपल्यातील कलागुण वापरून ती स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. यातच तिला एका नव्या व्यक्तीची साथ देखील मिळणार आहे. आदिती सारंगधर साकारत असलेल्या या व्यक्तिरेखेबद्दलची अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मालिकेच्या येत्या भागात हा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point