मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Ruth Prabhu: चित्रपटाच्या सेटवर समंथा रुथ प्रभू झाली जखमी; फोटो शेअर करत म्हणाली...

Samantha Ruth Prabhu: चित्रपटाच्या सेटवर समंथा रुथ प्रभू झाली जखमी; फोटो शेअर करत म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 28, 2023 06:13 PM IST

Samantha Ruth Prabhu injured on set: समंथा सध्या एका अ‍ॅक्शनपटात काम करत आहे. याच सेटवर ती जखमी झाली आहे.

Samantha Ruth Prabhu in Citadel
Samantha Ruth Prabhu in Citadel

Samantha Ruth Prabhu injured on set: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. एका गंभीर आजाराचा सामना करत असतानाच अभिनेत्री मनोरंजन विश्वात देखील सक्रिय आहे. आजारपणाचा परिणाम तिने आपल्या कामावर होऊ दिलेला नाही. मात्र, आता समंथाने स्वतःचा एक असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे की, ज्यामुळे चाहते काळजीत पडले आहेत. समंथा सध्या एका अ‍ॅक्शनपटात काम करत आहे. याच सेटवर ती जखमी झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ‘सिटाडेल’ या अमेरिकन सीरिजच्या हिंदी व्हर्जनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच सेटवर ती जखमी झाल्याचे समोर आले आहे. याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून दिली आहे. समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित तसेच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसह शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

समंथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने आपले दोन्ही हात दाखवले आहेत. तिच्या अंगठ्यावर जखमेच्या खुणा असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच हातावर काही जखमा आणि काही ओरखडेही दिसत आहेत. आपल्या हातांचा हा फोटो पोस्ट करत समंथाने कॅप्शन दिले की, ‘अॅक्शनचे परिणाम’. अ‍ॅक्शन सीक्वेन्स करताना तिला या दुखापती झाल्याचे तिच्या कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे.

Samantha Ruth Prabhu post
Samantha Ruth Prabhu post

‘सिटाडेल’ या लोकप्रिय हॉलिवूड सीरिजच्या भारतीय व्हर्जनची घोषणा आधीच करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता वरुण धवनसोबत वेब सीरिजचे शूटिंगही सुरू करण्यात आले होते. आता या सीरिजमध्ये वरुण धवन सोबत समंथाची जोडी देखील जमणार आहे. या सीरिजमध्ये समंथा रुथ प्रभू एका हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अद्याप ‘सिटाडेल’च्या या भारतीय व्हर्जनचे नाव निश्चित झाले नसून, लवकरच त्याची घोषणादेखील होणार आहे. मात्र, या दरम्यान आपल्या आवडत्या अभिनेत्रीला एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी समंथाचे चाहते देखील उत्सुक झाले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग