Pushpa The Rule Latest Update: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग करत आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आता या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पुष्पा २’ची पहिली झलक ८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. आता अल्लू अर्जुनचे चाहते ८ एप्रिलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ८ एप्रिल हा दिवस अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस देखील आहे.
अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’ची झलक प्रदर्शित झाली, तर अल्लू अर्जुन आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. अल्लू अर्जुनने काही आठवड्यांपूर्वी ‘पुष्पा: द रुल’चे शूटिंग पुन्हा सुरू केले. सध्याचे शेड्युल आटोपल्यानंतर तो त्याच्या कुटुंबीयांसह सुट्टीसाठी राजस्थानला रवाना झाला होता. मात्र, आता अल्लू अर्जुन शूटिंगवर परतला आहे.
‘पुष्पा २’ची शूटिंग आता पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे निर्माते अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’ची पहिली झलक रिलीज करण्याची योजना आखत आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुन ४१ वर्षांचा होणार असून, त्याचा हा दिवस आणखी खास बनवण्याची योजना निर्माते आखत आहेत. सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, ‘पुष्पा’ हा दोन भागांचा अॅक्शन ड्रामा चित्रपट असून, यामध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मात्र, ‘पुष्पा २’मध्ये यावेळी संमथा प्रभू दिसणार नाहीये. 'पुष्पा' या चित्रपटामध्ये समंथाने तिच्या 'ऊ अंटवा' या आयटम साँगमधून आपल्या अदांची जादू दाखवली होती. समंथाच्या या गाण्याचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. सध्या अभिनेत्री अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. समंथा तिच्या आगामी मेगा बजेट चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे तिने ‘पुष्पा २’ची ऑफर नाकारली आहे.