मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushpa: रशियामध्ये दिसणार ‘पुष्पा’चा जलवा; अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने होणार फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात!

Pushpa: रशियामध्ये दिसणार ‘पुष्पा’चा जलवा; अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने होणार फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 30, 2022 08:23 AM IST

Pushpa The Rise: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राईज'या ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपटाने रशियातील भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.

Pushpa The Rise
Pushpa The Rise

Pushpa The Rise: अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. अजूनही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. आता या चित्रपटाचा डंका रशियात देखील वाजणार आहे. १ ते ६ डिसेंबर दरम्यान, भारतीय चित्रपट महोत्सवाचा पाचवा वर्धापन दिन रशियातील २४ शहरांमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट कंपनी (इंडियन फिल्म्स)द्वारा भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र (एसआयटीए) यांसोबत मिळून, रशियन फेडरेशनचे मिनिस्ट्री ऑफ कल्चर तसेच रशियातील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने केले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोची आणि अनेक शहरांमध्ये राष्ट्रीय सिनेमा नेटवर्कमध्ये (सिनेमा पार्क) स्क्रीनिंगचे आयोजन केले जाईल. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राईज'या ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपटाने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमात भारतीय चित्रपटसृष्टीतील ६ हिट चित्रपटांचा समावेश असून, यामध्ये रशियात सर्वात जास्त आवडला जाणारा म्यूजिकल मेलोड्रामा चित्रपट 'डिस्को डान्सर'चा देखील समावेश आहे.

भारतीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ १ डिसेंबर रोजी मॉस्को येथील ‘ओशनिया’ शॉपिंग सेंटर येथे होईल. 'पुष्पा: द राईज' चित्रपटाचे लेखक आणि मुख्य कलाकार मेगा-स्टार आणि पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन, मॉडेल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुकुमार आणि निर्माता रविशंकर हे यावेळी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

पुष्पा’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभासाठी टोड्स बॅलेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अल्ला दुहोवा यांनी खास ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाच्या साउंडट्रॅकसाठी एक आकर्षक नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर, ३ डिसेंबर रोजी 'पुष्पा: द राईज'चे सर्व कलाकार आणि क्रू सदस्य सेंट पीटर्सबर्ग येथील ‘गॅलेरिया’ शॉपिंग सेंटर येथे पार पडणाऱ्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहतील.

या चित्रपट महोत्सवात सुकुमारद्वारा दिग्दर्शित 'पुष्पा: द राईज' या चित्रपटाचा समावेश असून, इतर लोकप्रिय भारतीय चित्रपटांमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'माय नेम इज खान' बब्बर सुभाष दिग्दर्शित 'डिस्को डान्सर', एसएस राजामौलीचा 'आरआरआर: राईज रोअर रिवोल्ट', ‘दंगल’, सिद्धार्थ आनंदचा 'वॉर' या बॉलिवूड चित्रपटांचा देखील समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग