मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: मुलाला धमकी मिळताच सलीम खान चिंतेत, सलमानच्या मित्राने दिली माहिती

Salman Khan: मुलाला धमकी मिळताच सलीम खान चिंतेत, सलमानच्या मित्राने दिली माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 21, 2023, 03:58 PM IST

  • Salim Khan: मुलाला धमकी मिळाल्यानंतर सलीम खान यांची काय अवस्था झाली आहे याची माहिती सलमानच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे.

सलीम खान

Salim Khan: मुलाला धमकी मिळाल्यानंतर सलीम खान यांची काय अवस्था झाली आहे याची माहिती सलमानच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे.

  • Salim Khan: मुलाला धमकी मिळाल्यानंतर सलीम खान यांची काय अवस्था झाली आहे याची माहिती सलमानच्या एका जवळच्या मित्राने दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या जीवाला सध्या धोका आहे. पुन्हा एकदा सलमान खानला धमक्या देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सलमान खानच्या टीमला धमकीचा ईमेल आला होता. या ईमेलनंतर सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सलमानला जेव्हा धमकीचा मेल आला तेव्हा सलीम खान यांची प्रतिक्रिया काय होती हे एका जवळच्या मित्राने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानला धमकी मिळताच सलीम खान यांना चिंता वाटत आहे. ते रात्रभर झोपले नाहीत. ते अतिशय शांत झाले आहेत. त्यांना सलमानची काळजी वाटत आहे असे सलमानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले.
वाचा: पाकिस्तानमधून आलेला स्वराच्या लग्नातील लेहंगा पाहिलात का?

“या गोष्टींचा अभिनेत्याला फरक पडत नाही. सलमान ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. तसेच पालकांना त्रास होऊ नये म्हणून कदाचित तो तसं भासवतोय. एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही” अशी माहिती सलमानच्या एका मित्राने वृत्तवाहिनीला दिली आहे.

सध्या सलमान खानला असे वाटतेय की, या धमकीकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल, तितके त्या व्यक्तीला वाटेल की, आपण आपले इप्सित साध्य केले आहे. जे व्हायचे ते होईल, असा त्याचा विश्वास आहे. सलमानला सशस्त्र रक्षकांशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान, वडील सलीम खान आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. सलमानला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

विभाग