देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळं सातत्यानं चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्हाला माहितीये का स्वराच्या लग्नातील लेहंगा हा पाकिस्तानवरुन पाठवण्यात आला होता. स्वराने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी स्वराच्या लग्नातील सगळे विधी झाले असून तिची पाठवणी झाली आहे. सध्या स्वरा फहदच्या बरेली येथील घरी आहे. रविवारी स्वरासाठी एक शानदार दावत-ए-वलीमा ठेवण्यात आला होता. इतकच नव्हे तर फहदच्या कुटुंबीयांनी स्वरासाठी पाकिस्तानमधील एका डिझायनरकडून लेहंगा मागावला होता. स्वराने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
स्वराने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने 'अतिशय सुंदर लेहंगा सेटची झलक. हद्दीच्या त्या बाजूने हा पाठवण्यात आला आहे. तो पाठवल्याबद्दल तुमचे आभार' या आशयाचे कॅप्शन दिले होते.
काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.
संबंधित बातम्या