मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: त्या दिवशी पहिल्यांदाच मला…; शाहरुखमुळे रितेशला लागली ही सवय

Riteish Deshmukh: त्या दिवशी पहिल्यांदाच मला…; शाहरुखमुळे रितेशला लागली ही सवय

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 23, 2022, 11:48 AM IST

    • Shahrukh Khan: रितेशचा शाहरुख विषयी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
रितेश देशमुख (HT)

Shahrukh Khan: रितेशचा शाहरुख विषयी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

    • Shahrukh Khan: रितेशचा शाहरुख विषयी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा सतत चर्चेत असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकजण त्याला आदर्श मानतात. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख देखील शाहरुथचा मोठा चाहता आहे. त्याने एका व्हिडीओमध्ये त्याची कबूली दिली होती. तसेच शाहरुखमुळे रितेशला गेली पाच वर्षे एक सवय लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख आणि अभिनेत्री तमन्ना भाटीया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रितेश शाहरुखच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना दिसत आहे. या भेटीच्या वेळी शाहरुखनमुळे रितेशला एक अशी सवय जडली जी त्याच्यासाठी अफेअरसारखी आहे.
वाचा : विजू मानेंनी धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेला दिला होता नकार, प्रवीण तरडेंनी सांगितला अनुभव

व्हिडीओमध्ये रितेश तमन्नाला सांगत आहे की, “शाहरुख खान माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आला होता, त्याला पाहून मी खूप उत्साहित झालो होतो. कारण मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. शाहरुखला भेटल्यावर मी त्याला काय घेणार? (चहा, कॉफी) असे विचारले. सुरुवातीला त्याने काहीच नको असे म्हटले. मात्र थोडा आग्रह केल्यानंतर शाहरुखने ब्लॅक कॉफी घेणार असे सांगितले. त्यावेळी पहिल्यांदाच ब्लॅक कॉफी काय असते, हे मला शाहरुखमुळे कळाल.”

पुढे तो म्हणाला, 'मी किचनमध्ये गेलो आणि शेफला कॉफी बनवायला सांगितली. त्याही माहिती नव्हते की ब्लॅक कॉफी कशी बनवायची. कसं बसं आम्ही ती बनवली. त्यानंतर मी ती कॉफी पुन्हा बनवून प्यायलो आणि मला ती आवडली. आता ब्लॅक कॉफी माझ्यासाठी एका अफेअरसारखी आहे.'

रितेश आणि तमन्ना लवकरच 'बबली बाउन्सर' चित्रपटामध्ये दिसणार आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबर २०२२ साली प्रदर्शित ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे.

विभाग