मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kantara 2: ‘कांतारा २’मध्ये दिसणार रजनीकांत? ऋषभ शेट्टीचा मोठा खुलासा

Kantara 2: ‘कांतारा २’मध्ये दिसणार रजनीकांत? ऋषभ शेट्टीचा मोठा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 20, 2023, 06:40 PM IST

  • Rishab Shetty Kantara 2: बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टीला कांतारा २मध्ये रजनीकांत दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

ऋषभ शेट्टी (HT)

Rishab Shetty Kantara 2: बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टीला कांतारा २मध्ये रजनीकांत दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

  • Rishab Shetty Kantara 2: बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टीला कांतारा २मध्ये रजनीकांत दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळतो. जवळपास सगळेच दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होताना दिसत आहेत. अशातच कांतारा या चित्रपटाने तर प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून सध्या चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच...

Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

अर्जुन-चैतन्यची झाली दिलजमाई; सायलीसोबत मिळून करणार साक्षीच्या कोट्याची सफाई! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Rishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांची ‘ती’ शेवटची इच्छा अपुरीच राहिली! पत्नी नीतू सिंह यांनी केला मोठा खुलासा!

काही दिवसांपूर्वी 'कांतारा २'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते. अशातच ऋषभ शेट्टीने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. असे म्हटले जात आहे की कांतारा २मध्ये रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
वाचा: कसा आहे कार्तिक आर्यनचा 'शहजादा'? जाणून घ्या…

ऋषभ शेट्टीने नुकताच बंगळुरु येथे झालेल्या कार्यक्रमात कांतारा हिट ठरण्यावर वक्तव्य केले आहे. त्यानंतर त्याला कांतारा २ विषयी काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्याने आम्ही स्क्रीप्टवर काम करत आहोत. सुरुवातीच्या अगदी बेसिक स्क्रीप्ट तयार झाली आहे असे म्हटले. तसेच या कार्यक्रमात त्याने कांताराच्या प्रीक्वलमधून प्रेक्षकांना वेगळे काही तरी पाहायला मिळणार असे देखील म्हटले आहे.

या कार्यक्रमात रजनीकांत कांतारा २मध्ये दिसणार का? असा प्रश्न ऋषभ शेट्टीला विचारण्यात आला. कारण रजनीकांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून कांताराचा रिव्ह्यू दिला होता. तसेच ऋषभच्या अभिनयाचे कौतुक केले होते. त्यानंतर रजनीकांत यांच्या घरी जाऊन ऋषभने चित्रपटाविषयी चर्चा केली आहे. त्यामुळे कांतारा २मध्ये रजनीकांत दिसण्याची शक्यता आहे.

‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे.

विभाग