मराठी बातम्या  /  Entertainment  /  Kartik Aryan Movie Shehzada Review Is Here

Shehzada Review: कसा आहे कार्तिक आर्यनचा 'शहजादा'? जाणून घ्या…

शहजादा
शहजादा (HT)
Aarti Vilas Borade • HT Marathi
Feb 17, 2023 10:14 AM IST

Kartik Aryan : कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणारा ‘शहजादा’ हा चित्रपट आज १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून 'शहजादा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आज अखेर १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पहिल्यांदा अॅक्शन अवतारामध्ये दिसत आहे. काय आहे चित्रपटाची कथा? चला जाणून घेऊया..

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपटाची कथा ही जिंदल एंटरप्राइजेस या कंपनीचे मालक रणदीप जिंदल म्हणजेच रोनित रॉय आणि त्यांच्याकडे काम करणारा स्टाफ वाल्मिकी म्हणजे परेश रावल यांच्या घरी मुलाच्या जन्मापासून होते. काही कारणास्तव वाल्मिकी मुलांची अदलाबदली करतो. त्यामुळे जिंदर कंपनीचा एकटा वारीस शहजादा बंटू म्हणजे कार्तिक आर्यन एका लहान क्लार्कचा मुलगा बनतो. तसेच त्या क्लार्कचा मुलगा राज जिंदल घराण्याचा वारीस बनतो.
वाचा: मी दिया मिर्झा...; लग्नाच्या वेळी मराठी घेतली शपथ! व्हिडीओ व्हायरल

बंटू नेहमी नशीबाला दोश देत असतो. त्याला नेहमी सेकंड हँड वस्तू वापरण्यासाठी मिळत असतात. नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख समारा म्हणजेच क्रिती सेनॉनशी होते. पहिल्याच भेटीत बंटू समाराच्या प्रेमात पडतो. त्याचवेळी वाल्मिकीने मुलांच्या जन्माच्या वेळी जे काही केले ते सत्य समोर येते आणि चित्रपटाच्या कथेत नवे वळण येते. त्यामुळे बंटू वाल्मिकीचे सत्य जिंदल कुटुंबीयांना सांगेल का? जिंदल कुटुंबीय बंटूचा स्विकार करतील का? समारा आणि बंटू यांच्या लव्ह स्टोरीचे पुठे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.

सुरुवातीला चित्रपट अतिशय संथ गतीने जातो. काही ठिकाणी चित्रपटात उगाचच सीन्स टाकले आहेत असे जाणवते. तसेच चित्रपट एडीट करणाऱ्याचा निष्काळजीपणा समोर येतो. माध्यंतरानंतर चित्रपट खर ट्रॅकवर येतो. चित्रपटातील कार्तिक आर्यनचे पंच सर्वांना नक्की आवडतील.

WhatsApp channel

विभाग