मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: कार्तिक पुन्हा दीपावर संशय घेणार? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्रॅक

Rang Maza Vegla: कार्तिक पुन्हा दीपावर संशय घेणार? ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्रॅक

Jan 30, 2023, 02:35 PM IST

    • Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे सगळे रुसवेफुगवे बाजूला सारून दीपा आणि कार्तिकचा संसार नव्याने सुरू झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा कार्तिक दीपावर संशय घ्यायला सुरुवात करणार आहे.
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे सगळे रुसवेफुगवे बाजूला सारून दीपा आणि कार्तिकचा संसार नव्याने सुरू झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा कार्तिक दीपावर संशय घ्यायला सुरुवात करणार आहे.

    • Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे सगळे रुसवेफुगवे बाजूला सारून दीपा आणि कार्तिकचा संसार नव्याने सुरू झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा कार्तिक दीपावर संशय घ्यायला सुरुवात करणार आहे.

Rang Maza Vegla Latest Update: छोट्या पडद्यावरची ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या मालिकेत नुकताच एक पॉझिटिव्ह ट्रॅक पाहायला मिळत होता. मात्र, या मालिकेत आता पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न पाहायला मिळणार आहेत. एकीकडे सगळे रुसवेफुगवे बाजूला सारून दीपा आणि कार्तिकचा संसार नव्याने सुरू झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा कार्तिक दीपावर संशय घ्यायला सुरुवात करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लीलाला शोधण्यात अभिराम यशस्वी होणार! पण... ; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार नवं रंजक वळण

डेस्कवर विसरलेलं समान मागण्यासाठी फोन केला अन् प्रेमात पडला! ‘बर्थडे बॉय’ पुष्कर श्रोत्रीची लव्हस्टोरी वाचाच...

Maharashtra Din : “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते

अर्जुन-चैतन्यची झाली दिलजमाई; सायलीसोबत मिळून करणार साक्षीच्या कोट्याची सफाई! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

मालिकेचा एक प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये दीपा घाईघाईने कुठे तरी जाताना दिसत आहे. तर, दीपाच्या मागोमाग कार्तिक देखील तिचा लपून पाठलाग करताना दिसत आहे. या दरम्यान दोघांवर दीपाच्या मैत्रिणीची नजर पडते. ती कार्तिकला पुन्हा दीपाचा पाठलाग करताना पाहून संतापते. यावेळी ती कार्तिकला अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न करते.

दरम्यान दोघांमध्ये चांगलाच वाद रंगणार आहे. दीपाची मैत्रीण कार्तिकला म्हणणार आहे की, तू अजूनही दीपावर संशय घेतो आहेस का? यावर संतापलेला कार्तिक तिला होकारार्थी उत्तर देतो. यानंतर भांडणाच्या ओघात तो तिला मी तुझा जीव घेतला असता, अशी धमकी देखील देतो. दरम्यान दीपा देखील दोघांना वाद घालताना बघते.

दीपाने स्वतःचा खरेपणा सिद्ध केल्यानंतर देखील कार्तिक अजूनही तिच्यावर संशय घेतोय हे बघून दीपाला देखील मोठा धक्का बसणार आहे. यानंतर दीपा देखील पुन्हा कार्तिकला जाब विचारणार आहे. दरम्यान दीपा कुठे जात आहे, याचा खलास झालेला नाही. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा संशय आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळ बघायला मिळणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना हा मनोरंजक ट्रॅक पाहायला मिळणार आहे.