मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Metro In Dino: ठरलं! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘मेट्रो इन दिनो’; सारा अली खान दिसणार मुख्य भूमिकेत

Metro In Dino: ठरलं! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘मेट्रो इन दिनो’; सारा अली खान दिसणार मुख्य भूमिकेत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2023 01:16 PM IST

Metro In Dino release date: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Metro In Dino release date
Metro In Dino release date

Metro In Dino release date: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सारा व्यतिरिक्त, या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान यांची जोडी झळकणार आहे. तर, सारा अली खान देखील पहिल्यांदाच अनुराग बसू यांच्यासोबत काम करणार आहे. ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटात नव्या पिढीची प्रेम कथा दाखवण्यात येणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. नव्या तरुण पिढीला लक्षात घेऊन या चित्रपटाची कथा लिहिली जात आहे.

बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून सारा अली खान हिचं नाव घेतलं जातं. सध्या सारा अली खानच्या हातात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी सारा शेवट ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत झळकले होते.

'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात सारा अली खान पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करत आहेत. याशिवाय सारा तिच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच एका धाडसी स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर ही सारा लक्ष्मण उतेकर यांच्या 'गॅसलाईट' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'लुका छुपी २' मध्येही झळकणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग