मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Jhoothi Main Makkaar Review: कसा आहे रणबीर-श्रद्धाचा ‘तू झुठी मैं मक्कार’? वाचा रिव्ह्यू

Tu Jhoothi Main Makkaar Review: कसा आहे रणबीर-श्रद्धाचा ‘तू झुठी मैं मक्कार’? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 08, 2023, 12:08 PM IST

    • Tu Jhoothi Main Makkaar: ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटातील कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाच्या कॅमिओने चार चाँद लावल्याचे दिसत आहे.
तू झुठी मैं मक्कार (HT)

Tu Jhoothi Main Makkaar: ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटातील कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाच्या कॅमिओने चार चाँद लावल्याचे दिसत आहे.

    • Tu Jhoothi Main Makkaar: ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटातील कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचाच्या कॅमिओने चार चाँद लावल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

चित्रपटाच्या सुरुवातीला मिकी म्हणजेच रणबीर कपूर आणि डबास म्हणजे अनुभव सिंह बस्सी प्लानिंग करुन एका मुलाचा ब्रेकअप करतात. त्यानंतर मिकी हा अतिशय श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा असतो. डबास हा त्याचा बेस्ट फ्रेंड असतो. बिझनेस सोडला तर मिकी आणि डबास अनेकांचे ब्रेकअप करण्याचे काम देखील करत असतात. डबासचे लग्न होणार असते. त्याच्या पत्नीची श्रद्धा कपूर म्हणजेच टिनी ही मैत्रिण दाखवण्यात आली आहे. मिकी आणि टिनी यांची ओळख होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर होते.
वाचा: आशुतोषने अरुंधतीसाठी घेतला खास उखाणा Video Viral

चित्रपट हा लव रंजन यांचा असल्यामुळे सिंपल लव्हस्टोरी पाहायला मिळणे शक्यच नाही. सुट्ट्यांचा आनंद घेऊन मिकी आणि टिनी घरी परत येतात. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतात. सगळं काही सुरळीत सुरु असताना टिनीला ब्रेकअप करायचा असतो. त्यासाठी ती मिकीला फोन करते. पण खरच त्या दोघांचा ब्रेकअप होतो का? ते दोघं लग्न करतात का? मिकी कुटुंबीयांना काय सांगणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट जाऊन पाहावा लागणार आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातील लव रंजन यांचे दिग्दर्शन पाहण्यासारखे आहे. पण त्यांच्या नेहमीच्या पॅटर्नमधील हा सिनेमा असल्याचे समोर आले आहे. पुन्हा एकदा रणबीने तो कमालीचा अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. चित्रपटातील काही सीन्स पाहाताना प्रेक्षकांना 'ये जवानी है दीवानी'मधील रणबीर कपूरची आठवण येईल. तर दुसरीकडे श्रद्धा कपूरने बोल्डनेस आणि क्यूटनेसने सर्वांची मने जिंकली आहेत.