मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आशुतोषने अरुंधतीसाठी घेतला खास उखाणा Video Viral

Aai Kuthe Kay Karte: आशुतोषने अरुंधतीसाठी घेतला खास उखाणा Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 06, 2023 02:46 PM IST

Aai Kuthe Kay Karte Latest Update: केळकरांच्या घरी आशुतोषचा हळदी समारंभ पार पडत आहे. त्यावेळी त्याने घेतलेल्या उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आई कुठे काय करते
आई कुठे काय करते (HT)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये आता प्रेक्षकांना अतिशय नाट्यमय घडमोडी पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्न सोहळा पार पडणार असून, या लग्नसोहळ्यात देखील अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. नुकताच अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नातील मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. आता आशुतोष- अरुंधतीची हळद रंगणार आहे. दरम्यान, आशुतोषने घेतलेल्याने उखाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष आणि अरुंधतीचा हळदी समारंभ दिसत आहे. त्यावेळी केळकर कुटुंबीयांनी आशुतोषला खास उखाणा घ्यायला लावला आहे.
वाचा: हृतिक करणार गर्लफ्रेंड सबाशी लग्न? राकेश रोशन यांनी सांगितलं सत्य

आशुतोषने अरुंधतीसाठी खास उखाणा घेतला आहे. 'सगळे मागे लागेत उखाणा घे नाव घे आता लवकर घरी ये अरुंधती आशुतोष केळकर होऊन' असा उखाणा आशुतोषने घेतला. त्याच्या या उखाण्याने संपूर्ण केळकर कुटुंब चकीत झाले.

यापूर्वी अरुंधतीच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरुंधतीने सुंदर केशरी रंगाची पैठणी साडी नेसली आहे. कपाळी मुंडवळ्या, हातात हिरवा चुडा आणि गळ्यात सुंदर असे मोत्याचे गळ्यातले अरुंधतीने घातले आहे. या लूकमध्ये अरुंधती अतिशय सुंदर दिसत आहे. अरुंधतीचा हा व्हिडीओ शेअर करत प्रवाह वाहिनीने, 'नवरी सजतेय' असे कॅप्शन दिले आहे. सध्या अरुंधतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग