मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hrithik Roshan: हृतिक करणार गर्लफ्रेंड सबाशी लग्न? राकेश रोशन यांनी सांगितलं सत्य

Hrithik Roshan: हृतिक करणार गर्लफ्रेंड सबाशी लग्न? राकेश रोशन यांनी सांगितलं सत्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 04, 2023 10:54 AM IST

Hrithik Roshan and Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबासोबत फिरताना दिसत आहे. आता तो लग्न करणार की नाही यावर हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद
हृतिक रोशन आणि सबा आझाद (HT)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो सबा आझादला डेट करत आहे. अनेकदा पार्ट्यांना, कुटुंबीयांसोबत ते दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. आता ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये हृतिक आणि सबा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला आहे की सबा आणि हृतिक खरच लग्न करणार आहेत की या सर्व अफवा आहेत. आता राकेश रोशन यांनी यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्ण दिला आहे.
वाचा: 'मन्नत'मध्ये घुसले दोन अज्ञात व्यक्ती, कुठे होता शाहरुख?

बॉलिवूड हंगामाने राकेश रोशन यांच्याशी संपर्क साधला. ते या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'मला याबाबत अद्याप माहिती नाही. त्या दोघांच्या नात्याला वेळ द्या. मैत्री झाली की लग्नाच्या गोष्टी सुरू. हृतिक प्रेमात असला तरी लहान नाही, त्याला मुले आहेत आणि त्याच्यावर मुलांची जबाबदारी आहे.'

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड रंगत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे डिनर डेटवर एकत्र दिसले होते. यानंतर सबा आझादने हृतिकच्या फॅमिली गेट टुगेदरलाही हजेरी लावली होती. करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील दोघे हातात हात घालून फिरताना दिसले होते. याच पार्टीत त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले.

हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

IPL_Entry_Point