मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raavrambha: रणांगण मराठ्यांच्या रक्तात असते; रावरंभागाचा अंगावर शहारे आणणार ट्रेलर प्रदर्शित

Raavrambha: रणांगण मराठ्यांच्या रक्तात असते; रावरंभागाचा अंगावर शहारे आणणार ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

May 04, 2023, 10:59 AM IST

    • Raavrambha Trailer: १२ मे ला 'रावरंभा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
रावरंभा

Raavrambha Trailer: १२ मे ला 'रावरंभा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

    • Raavrambha Trailer: १२ मे ला 'रावरंभा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी 'रावरंभा' या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

'रावरंभा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राव आणि रंभा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत.
वाचा: धर्मेंद्र-हेमा मालिनी यांनी लग्नानंतर मिळून खरेदी केला होता आलिशान बंगला! पाहा

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे.

विभाग