मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: ‘बाहुबली २’ला ‘पठाण’ने दिली मात; शाहरुखच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम!

Pathaan Collection: ‘बाहुबली २’ला ‘पठाण’ने दिली मात; शाहरुखच्या चित्रपटाने रचला नवा विक्रम!

Feb 22, 2023, 11:13 AM IST

  • Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ या चित्रपटाने अवघ्या २८ दिवसांत असा विक्रम रचला आहे, जो याआधी कोणताही बॉलिवूड चित्रपट करू शकलेला नाही.

Pathaan Box Office Collection

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ या चित्रपटाने अवघ्या २८ दिवसांत असा विक्रम रचला आहे, जो याआधी कोणताही बॉलिवूड चित्रपट करू शकलेला नाही.

  • Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ या चित्रपटाने अवघ्या २८ दिवसांत असा विक्रम रचला आहे, जो याआधी कोणताही बॉलिवूड चित्रपट करू शकलेला नाही.

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने अवघ्या २८ दिवसांत असा विक्रम रचला आहे, जो याआधी कोणताही बॉलिवूड चित्रपट करू शकलेला नाही. अवघ्या २८ दिवसांत पठाणने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा जादुई आकडा गाठला आहे. आपणच बॉक्स ऑफिसवरचा ‘बादशाह’ असल्याचे शाहरुख खानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

‘पठाण’ या चित्रपटाने केवळ हिंदीमध्ये ५०० कोटींची कमाई केली नाही, तर हा जादुई आकडा सर्वात जलद गतीने गाठणारा पहिला चित्रपटही ठरला. ‘पठाण’ने २८ दिवसांत हा विक्रम केला आहे. कमाईच्या बाबतीत ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ला मात दिली आहे. एसएस राजामौलींचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली २’ने हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर ३४ दिवसांत ५०० कोटींची कमाई केली होती. मात्र, शाहरुख खानच्या ‘पठाण’ने हा विक्रम मोडीत काढला आहे.

‘पठाण’ रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही छप्परफड कमाई करत आहे. कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. पण, ‘पठाण’च्या कमाईवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘पठाण’ या चित्रपटाने २८व्या दिवशी १.१० कोटींची कमाई केली आहे. याआधी या चित्रपटाने चौथ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २.२० कोटी, शनिवारी ३.२५ कोटी, रविवारी ४.१५ कोटी आणि सोमवारी २७व्या दिवशी १.२० कोटींचा व्यवसाय केला होता. यासह आता ‘पठाण’च्या एकूण कमाईने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अ‍ॅक्शन चित्रपट ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.