मराठी बातम्या  /  Entertainment  /  Don 3 Update Kartik Aaryan Will Replace Shah Rukh Khan In Don 3 Know The Truth

Don 3: ‘डॉन ३’मध्ये कार्तिक आर्यन शाहरुख खानला रिप्लेस करणार? जाणून घ्या...

Kartik-ShahRukh
Kartik-ShahRukh
Harshada Bhirvandekar • HT Marathi
Feb 22, 2023 10:46 AM IST

Don 3 Update: शाहरुख खानच्या जागी ‘डॉन ३’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Don 3 Update: बॉलिवूडमध्ये यंदा अनेक बहुचर्चित चित्रपटांचे सिक्वेल पाहायला मिळणार आहेत. यात शाहरुख खानच्या ‘डॉन ३’ या चित्रपटाचीही चर्चा आहे. मात्र, आता या चित्रपटातून शाहरुख खान याने काढता पाय घेतल्याचे म्हटले जात आहे. तर, शाहरुख खानच्या जागी ‘डॉन ३’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याची चर्चा सुरू झालीये ती एका सोशल मीडिया ट्वीटमुळे.. सोशल मीडियावर एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटमध्ये कार्तिक आर्यन ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हर्ष मिश्रा नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, 'जर सगळ्या अटी मान्य झाल्या तर, सुपरस्टार कार्तिक आर्यन डॉन ३मध्ये मुख्य भूमिकेत दिसू शकतो. असे झाले तर बॉक्स ऑफिसवर सुनामी येईल. वर्ल्डवाइड कलेक्शन - १२०० ते १५०० कोटी रुपये.' अर्थात या युझरने कार्तिक आर्यनची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षयच्या पुनरागमनामुळे आता कार्तिकवर मीम्स तयार केल्या जात आहेत.

सोशल मीडियावर हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले असून, यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, 'मी ऐकले आहे की कार्तिक आर्यन धूम ४, रेस ४ देखील करत आहे.' तर, दुसर्‍याने कमेंटमध्ये लिहिले, ‘गोलमाल ५ आणि सिंघम ३मध्ये देखील कार्तिक आर्यन दिसणार आहे.’ ट्विटर युजर या ट्विटवर भरपूर कमेंट करत आहेत. काही जण म्हणत आहेत की कार्तिक आर्यन आता ५०० कोटी मानधन आकारेल, असे म्हणत त्याची खिल्ली उडवत आहेत. तर, काहींनी ‘डॉन केवळ शाहरुख खानच आहे, असे म्हटले आहे.

‘हेरा फेरी ३’साठी कार्तिक आर्यनचे नाव फायनल करण्यात आले होते. अक्षय कुमारने स्क्रिप्टमुळे चित्रपटातूनकाढता पाय घेतला होता. त्यानंतर कार्तिकची एन्ट्री झाली होती. मात्र, आता अक्षय चित्रपटात परतल्याने कार्तिकला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय कार्तिक आर्यन जान्हवी कपूरसोबत ‘दोस्ताना २’मध्ये दिसणार होता. मात्र, या चित्रपटातूनही त्याला काढून टाकण्यात आलं आहे.

WhatsApp channel