मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sameer Khakhar Death: ‘नुक्कड’ फेम अभिनेते समीर खाखर यांचे निधन

Sameer Khakhar Death: ‘नुक्कड’ फेम अभिनेते समीर खाखर यांचे निधन

Mar 15, 2023, 10:10 AM IST

  • Sameer Khakhar Passes Away: ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले.

Sameer Khakkar

Sameer Khakhar Passes Away:‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले.

  • Sameer Khakhar Passes Away: ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले.

Sameer Khakhar Passes Away:दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून घराघरांत प्रसिद्ध झालेले अभिनेते समीर खाखर यांचे आज (१५ मार्च) निधन झाले.'पुष्पक', 'शहेनशाह', 'रखवाला', 'दिलवाले', 'राजा बाबू'यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये समीर खक्कर झळकले आहेत. मात्र, १९९६मध्ये त्यांनी अभिनय कारकिर्दीला राम राम ठोकून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेत ते जावा कोडर म्हणून नोकरी करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

समीर खाखर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. काल (१५ मार्च) दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यानंतर समीर यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. 

समीर खक्कर यांनी'नुक्कड' या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘खोपडी’ ही भूमिका तुफान गाजली. त्यानंतर समीर दूरदर्शनच्या'सर्कस' या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले होते. समीर यांनी ‘डीडी मेट्रो’च्या'श्रीमान श्रीमती' या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिका साकारली होती. तर,'संजीवनी' या लोकप्रिय मालिकेत ते ‘गुड्डू माथूर’ची भूमिका साकारताना दिसले होते. काही वर्षांपूर्वी ते'हसी तो फसी', 'जय हो', 'पटेल की पंजाबी शादी' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकले होते.

विभाग