मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nilesh Sable: डॉक्टर ते अ‍ॅक्टर; असा सुरू झाला होता निलेश साबळेचा फिल्मी प्रवास!

Nilesh Sable: डॉक्टर ते अ‍ॅक्टर; असा सुरू झाला होता निलेश साबळेचा फिल्मी प्रवास!

May 30, 2023, 07:49 AM IST

  • Dr Nilesh Sable: महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा अभिनेता डॉ. निलेश साबळे सर्वांचाच लाडका बनला आहे.

Nilesh Sable

Dr Nilesh Sable: महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा अभिनेता डॉ. निलेश साबळे सर्वांचाच लाडका बनला आहे.

  • Dr Nilesh Sable: महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा अभिनेता डॉ. निलेश साबळे सर्वांचाच लाडका बनला आहे.

Nilesh Sable:चला हवा येऊ द्या’ म्हटलं की, डोळ्यासमोर येणारा पहिला चेहरा म्हणजे डॉ. निलेश साबळे. डॉक्टर असलेला हा अभिनेता म्हणजेच निलेश साबळे आता मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी ते मनोरंजन विश्वातील डॉक्टरकी असा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून स्पर्धक म्हणून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आज ‘चला हवा येऊ द्या’ सर्वेसर्वा असण्यापर्यंत पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा हा अभिनेता सर्वांचाच लाडका बनला आहे. अगदी लहानपणापासूनच निलेश साबळेचा अभिनयाकडे कल होता. स्टेजवर काम करणं त्याला खूप आवडायचं. शाळेत असल्यापासूनच तो अनेक कार्यक्रमांत साहभागी व्हायचा. निलेशने खूप शिकून, मेहनत करून डॉक्टरची पदवी मिळवली. आपला मुलगा डॉक्टर झाल्यावर त्याच्या आई-वडिलांनाही खूप अभिमान वाटला होता. पदवी घेतल्यानंतर त्याने वाशीच्या एमजीएम न्यू बॉम्बे या हॉस्पिटलमध्ये सहा महिने नोकरी देखील केली. मात्र, त्याच्यातील अभिनयाचं वेड त्याला शांत बसू देत नव्हतं. याच दरम्यान त्याला ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमाची माहिती मिळाली. या संदर्भात तो आई-वडिलांशी बोलला.

Tu Chal Pudha: शिल्पीची दुष्ट खेळी मयुरीच्या जीवावर बेतणार? ‘तू चाल पुढं’मध्ये धक्कादायक वळण

डॉक्टर झाला असला, तरी निलेशला मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे होते. त्याच्या या निर्णयाला पालकांनी होकार दिला. पण, त्यांनी निलेशसमोर एक अट देखील ठेवली. आई-वडील निलेशला म्हणाले की, ‘तू जा पण, जर दोन वर्षात या क्षेत्रात काही करू शकला नाहीस, तर पुन्हा डॉक्टरकीकडे वळायचं.’ मात्र, ती वेळ निलेशवर कधीच आली नाही. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’नंतर निलेश साबळे मनोरंजन क्षेत्रात वेगाने यशस्वी घौडदौड करू लागला. त्याचं यश पाहून आई-वडील देखील आनंदित होते.

डॉक्टर निलेश साबळे याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. इथूनच त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता. यानंतर त्याने छोट्या पडद्यावरच्या ‘फु बाई फु’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. सूत्रसंचालक म्हणून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आता अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत पोहोचला आहे.

विभाग