मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: शिल्पीची दुष्ट खेळी मयुरीच्या जीवावर बेतणार? ‘तू चाल पुढं’मध्ये धक्कादायक वळण

Tu Chal Pudha: शिल्पीची दुष्ट खेळी मयुरीच्या जीवावर बेतणार? ‘तू चाल पुढं’मध्ये धक्कादायक वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 29, 2023 03:43 PM IST

Tu Chal Pudha Latest Update: अश्विनीने जसं आपल्याला आपल्या मुलापासून दूर केलं, तसचं आता तिला तिच्या मुलींपासून दूर करायचं आणि आपला बदला पूर्ण करायचा असा निर्णय शिल्पीने घेतला आहे.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Update:तू चाल पुढं’ या मालिकेत आता धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. शिल्पीने अश्विनी आणि तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. तिच्या तिच्या दुष्ट खेळींमध्ये आता प्रतीकला देखील सामील करून घेणार आहे. अश्विनीने जसं आपल्याला आपल्या मुलापासून म्हणजेच संजूपासून दूर केलं, तसचं आता तिला तिच्या मुलींपासून दूर करायचं आणि आपला बदला पूर्ण करायचा असा निर्णय तिने घेतला आहे. मात्र, तिचा हाच दुष्ट डाव आता मयुरीच्या जीवावर बेतणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीकला सतत कुणाचा तरी फोन येत असतो. हा फोन येताच प्रतीक कावराबावरा होऊन जातो. सगळ्यांनीच त्याला याबद्दल विचारणा केली. मात्र, एक क्लायंट आपल्याला सतत त्रास देत असल्याचे तो म्हणतो. मात्र आता त्याला फोन करणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा समोर आला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, शिल्पी आहे. मयुरीला हाताशी धरून तिला त्रास देऊन आपण अश्विनीला उद्ध्वस्त करू शकतो, असा नवा प्लॅन तिने आखला आहे. स्वतःच्या याच प्लॅनमध्ये शिल्पीने प्रतीकला जबरदस्ती सामील करून घेतले आहे. मात्र, प्रतीकने यासाठी नकार दिला आहे.

Mrunmayee Deshpande Birthday: ‘केसरबाई’ ते ‘कुसुम’; अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या ‘या’ गाजलेल्या भूमिका पाहिल्यात?

प्रतीकचा नकार ऐकून शिल्पी मात्र खवळली आहे. जर तू माझी साथ दिली नाहीस, तर मी मयुरीचा जीव घेईन, अशी धमकी शिल्पीने दिली आहे. मात्र, प्रतीकला वाटते की ही केवळ धमकी देत आहे. त्याच दिवशी खाली सामान आणायला गेलेल्या मयुरीच्या मागे एक बाईकस्वार लागतो. या दरम्यान तो बाईकस्वार मयुरीला जोराचा धक्का देतो आणि तिला खाली पाडतो. त्याच वेळी प्रतीक तिथे येतो आणि मयुरीला सावरून घरी गेऊन जातो. हे कुणी केलंय ते आता प्रतीकच्या लक्षात आले आहे. आपण जर शिल्पीची साथ दिली नाही, तर ती खरंच मयुरीचा जीव घेईल याची खात्री प्रतीकला झाली आहे.

आता प्रतीक स्वतःचं मन मारून शिल्पीची साथ देण्याचा निर्णय घेणार आहे. या दरम्यान शिल्पी प्रतीककडे औषध देऊन, तिला इजा पोहचवण्याचा डाव आखणार आहे. आता शिल्पीचा हा डाव यशस्वी होणार का? तिचा हा खेळ मयुरीच्या जीवावर बेतणार का? याची उत्तरं मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग