मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vadh Trailer Out: नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या ‘वध’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिला का?

Vadh Trailer Out: नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या ‘वध’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिला का?

Nov 23, 2022, 10:59 AM IST

    • Vadh Trailer Out: ‘वध’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. एक जबरदस्त सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Vadh Trailer

Vadh Trailer Out: ‘वध’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. एक जबरदस्त सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    • Vadh Trailer Out: ‘वध’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. एक जबरदस्त सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Vadh Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्या ‘वध’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन प्रतिभावान कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘वध’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. एक जबरदस्त सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावरही शहारे आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

‘वध’च्या २.४१ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एक अतिशय मनोरंजक मर्डर मिस्ट्रीचची झलक पाहायला मिळते आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अभिनेते संजय मिश्रा आपण केलेल्या एका मर्डरची कबुली पोलिसांकडे जाऊन देत आहेत. हा खून आपण नेमका कसा केला, हे त्या हवालदाराला सांगत आहेत. मात्र, हवालदार त्यांच्या कथेवर विश्वास ठेवत नाही. यानंतर ट्रेलरमध्ये एक फ्लॅशबॅक कथा पाहायला मिळते. अर्थात या मर्डर मिस्ट्रीची सुरुवात नेमकी कशी झाली ते यात दाखवण्यात आले आहे.

‘वध’ या चित्रपटात अभिनेते संजय मिश्रा आणि अभिनेत्री नीना गुप्ता पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका गरीब कुटुंबातील हे जोडपे एकमेकांचा आधार बनून राहत आहेत. त्यांचा मुलगा परदेशात असून, आपल्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी काहीच करत नाहीये. अशावेळी ही वयोवृद्ध जोडी एका माणसाकडून उधार पैसे घेते आणि या कथेला सुरुवात होते. या दरम्यान घडणाऱ्या घटना अतिशय धक्कादायक आहेत. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

चित्रपटाचा ट्रेलर इतका कमाल आहे की, प्रत्येक फ्रेममध्ये गुंतून पडायला होतं. पुढे काय घडणार याची उत्सुकता या ट्रेलरने चांगलीच वाढवली आहे. संजय मिश्रा यांना ब्रेकनंतर पुन्हा पडद्यावर पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. 'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, ‘जे स्टुडिओ’ आणि ‘नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शन’ने याची निर्मिती केली आहे. ‘लव फिल्म्स’चे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘वध’ हा चित्रपट येत्या ९ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

विभाग