मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जर विवियन आवडले नसते तर त्यांच्या मुलीला जन्म का दिला असता?- नीना गुप्ता

जर विवियन आवडले नसते तर त्यांच्या मुलीला जन्म का दिला असता?- नीना गुप्ता

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 07, 2022 09:59 AM IST

(neena gupta on her lovelife) नीना गुप्ता विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. रिलेशनशिपमध्ये असताना त्या गरोदर होत्या. नीना आणि व्हिव्हियनचे कधीही लग्न झालं नव्हतं. दोघांनाही एक मुलगी मसाबा असून ती फॅशन डिझायनर आहे.

नीना गुप्ता
नीना गुप्ता

(neena gupta talking on ex boyfriend vivian) नीना गुप्ता या अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहेत, परंतु त्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. नीना वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. याच काळात त्या आई झाल्या. दोघांचं लग्न झालं नाही, परंतु तरीही अभिनेत्रीने त्यांच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्या मसाबाच्या आई झाल्या. नीना आणि विवियन यांचं लग्न झालं नव्हतं तरीही त्यांच्या मुलीच्या जन्मानंतरही ते भेटत असत. मसाबा देखील विवियनच्या खूप जवळ आहे आणि ती देखील त्यांना अनेकदा भेटत असते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नीना यांना विचारण्यात आलं की, त्या विवियन यांचा तिरस्कार करतात? त्यावर नीना म्हणाल्या, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? आपण राहू शकत नाही, आपण एकत्र राहू शकत नाही. पण म्हणून मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा तिरस्कार करत नाही. तसंच मी माझ्या एक्सपतीचा देखील द्वेष करत नाही. मी त्यांचा तिरस्कार का करू?' विवियन यांच्याबद्दल बोलताना नीना म्हणाल्या, 'जर मला कुणी इतकं वाईट वाटलं असतं किंवा मी त्यांचा तिरस्कार केला असता तर मी त्यांच्या मुलीला जन्म का दिला असता? मी वेडी आहे का?'

नीना यांनी एकटीने मसाबाला वाढवलं. नंतर, २००८ मध्ये त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं. नीना आणि मसाबा यांची 'मसाबा-मसाबा' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता नुकताच त्याचा दुसरा सीझन आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग