मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Vs GT : बंगळुरूत गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा, आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

RCB Vs GT : बंगळुरूत गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा, आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 07:16 PM IST

RCB Vs GT IPL 2024 Score : आयपीएल २०२४ मध्ये आज बंगळुरू आणि गुजरात आमनेसामने होते. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा ४ विकेट्सनी पराभव केला.

RCB Vs GT  : बंगळुरूत गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा, आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत
RCB Vs GT : बंगळुरूत गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा, आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा जिवंत (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५२ वा सामना आज (४ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा उडवला.

ट्रेंडिंग न्यूज

 या सामन्यात गुजरातने आरसीबीला विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी आरामात गाठले. आरसीबीचा ११ सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला. दुसरीकडे, टायटन्सचा हा तब्बल सामन्यांमधील सातवा पराभव ठरला.

या विजयामुळे आरसीबी संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी ५.५ षटकांत ९२ धावांची सलामी दिली. कोहलीने २७ चेंडूत ४२ धावा केल्या, ज्यात ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तर डु प्लेसिसने अवघ्या २३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. डू प्लेसिसने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार मारले.

मात्र, सलामीच्या भागीदारीनंतर आरसीबीच्या डावाला गळती लागली. आरसीबीने अवघ्या २५ धावांतच ६ विकेट गमावल्या. यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी नाबाद ३५ धावा जोडल्या आणि आरसीबीला विजय मिळवून दिला. स्वप्नील १५ धावा करून नाबाद राहिला आणि कार्तिक २१ धावा करून नाबाद राहिला. 

गुजरातकडून आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने ४ बळी घेतले.

आरसीबी वि. गुजरात क्रिकेट स्टेडिमयम

कोहली बाद

आरसीबीला विराट कोहलीच्या रूपाने सहावा धक्का बसला. त्याला ११व्या षटकात नूर अहमदने बाद केले. कोहली ४२ धावा करून बाद झाला.

आरसीबीला चौथा धक्का

आरसीबीची चौथी विकेटही पडली. जोशुआ लिटलला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने आणखी एक विकेट मिळाली. त्याला केवळ ४ धावा करता आल्या.

आरसीबीला पहिला धक्का

आरसीबीला पहिला धक्का जोशुआ लिटलने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात दिला. त्याने फॅफ डुप्लेसिसला बाद केले. तो २३ चेंडूत ६४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. ६ षटकांनंतर संघाची धावसंख्या ९२/१ आहे.

आरसीबीची वादळी सुरुवात

आरसीबीने दमदार सुरुवात केली आहे. विराट कोहली (१४) आणि फाफ डुप्लेसिस (३२) गोलंदाजांवर आक्रमण करत आहेत. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या ४६/० आहे.

गुजरातचा डाव १४७ धावांत आटोपला

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव १४७ धावांत आटोपला. गुजरातची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या ६ षटकात संघाची धावसंख्या ३ विकेट्सवर केवळ २३ धावा होती. 

मात्र, राहुल तेवतियाच्या २१ चेंडूत ३५ धावा, शाहरुख खानच्या २४ चेंडूत ३७ धावा, डेव्हिड मिलरच्या २० चेंडूत ३० धावा आणि रशीद खानच्या १४ चेंडूत १८ धावांच्या उपयुक्त खेळीने गुजरातला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

गिल बाद

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल दोन धावा करून बाद झाला. चौथ्या षटकात सिराजने त्याला विशाककरवी झेलबाद केले. शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. चार षटकांनंतर संघाची धावसंख्या १४/२ आहे.

गुजरातला पहिला धक्का

मोहम्मद सिराजने गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने ऋद्धिमान सहाला बाद केले. आता साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. दोन षटकानंतर संघाच्या धावसंख्येची संख्या ३/१ आहे.

आरसीबीने टॉस जिंकला

बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आपला संघ कोणताही बदल न करता खेळताना दिसेल, असे कर्णधार फाफ डुप्लेसिसने सांगितले. त्याचबरोबर गुजरातचा संघ दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. मानव सुथारला पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय जोशुआ लिटलला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

इम्पॅक्ट सब: संदीप वारियर, विजय शंकर, जयंत यादव, नळकांडे, बीआर शरथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशाख.

इम्पॅक्ट सब: अनुज रावत, महिपाल लोमरोर, आकाश दीप, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई.

IPL_Entry_Point