मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Movies Releasing This Week: ‘चौक’ ते ‘जरा हटके जरा बचके’; जूनच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!

Movies Releasing This Week: ‘चौक’ ते ‘जरा हटके जरा बचके’; जूनच्या पहिल्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी!

May 30, 2023, 12:43 PM IST

  • Movies Releasing This Week 2 June: जूनच्या पहिल्याच आठवड्यात मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. तीन मराठी, तर एक हिंदी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Movies Releasing This Week 2 June

Movies Releasing This Week 2 June: जूनच्या पहिल्याच आठवड्यात मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. तीन मराठी, तर एक हिंदी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Movies Releasing This Week 2 June: जूनच्या पहिल्याच आठवड्यात मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. तीन मराठी, तर एक हिंदी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Movies Releasing This Week 2 June: मे महिना संपत आला असली तरी, सुट्ट्या मात्र अजूनही संपलेल्या नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यातही बऱ्यापैकी सुट्ट्यांचा माहोल असणार आहे. याच संधीचा फायदा घेत जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ जून, शुक्रवारी अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. जूनच्या या पहिल्याच आठवड्यात मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. तीन मराठी तर एक हिंदी चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला तर पाहूया यादी...

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

चौक

सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’. या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळणार आहे. प्रवीण तरडेंचा हा चित्रपट २ जूनला रिलीज होणार आहे.

फकाट

पैशांसाठी भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला देऊ पाहणाऱ्या तरुणांची कथा ‘फकाट’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. घरच्यांनी आपण काहीच करू शकत नसल्याची आशा सोडल्यानंतर अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात, यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा धमाल चित्रपट देखील २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Video: चेन्नई जिंकताच सारा-विकीचा जल्लोष; आता सोशल मीडियावर होतायत ट्रोल! नेमकं कारण काय?

बटरफ्लाय

आपल्या प्रत्येकाचं एक दैनंदिन आयुष्य हे ठरलेलं असत आणि आपण तसंच ते जगत असतो. पण एक दिवस मेघाच्या आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते, ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम या जोडीचा हा चित्रपट २ जूनला रिलीज होणार आहे.

जरा हटके जरा बचके

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशलचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट येत्या २ जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. या कथेतील एक जोडपे प्रेमात पडते आणि सुखाने स्थायिक होते. परंतु, काही वर्षांनी त्यांच्यात कडाक्याचे भांडण होते आणि हा वाद रोज उग्र रूप धारण करत जातो. दोघेही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. या दरम्यान दोघांमध्ये काय काय होते, हे या चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आले आहे.